Headlines

shivsena sanjay raut slams cm eknath shinde devendra fadnavis

[ad_1]

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्याच शिवसेनेतील बंडखोरांच्या गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत नवीन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या दोघांचा शपथविधी होऊन १५ दिवस उलटल्यानंतर देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे. आज शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीला देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्री उपस्थित होते. त्यामुळे यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. शिवाय बंडखोर आमदारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारवर एकीकडे टांगती तलवार असताना दुसरीकडे विरोधकांकडून टीका केली जात आहे.

“बालिश कारभार सुरू आहे”

संजय राऊतांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून सरकारला लक्ष्य केलं आहे. “अत्यंत बालिश आणि बेकायदेशीर पद्धतीने राज्याचा कारभार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी यासंदर्भातला खटला सुरू आहे. उपमुख्यमंत्री कालपर्यंत मुख्यमंत्री होते. अजून मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेलं नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या ‘गरज पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढून शिंदे गटाला रोखू’ वक्तव्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही आधी…”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी नामांतराचा निर्णय पुन्हा मंजूर केल्याच्या मुद्द्यावरून देखील टोला लगावला. “मंत्रीमंडळाच्या पूर्ण कोरमसह मंजूर झालेला आधीचा ठराव रद्द करण्याची हिंमत हे लोक कशी करू शकतात? आता त्यांनी तोच ठराव पुन्हा मंजूर केला. दोघांचंच मंत्रीमंडळ? याला कुणी मंत्रीमंडळ म्हणतात का? दोघांचं मंत्रीमंडळ जगात कुणी पाहिलंय का? १५ दिवस होत आले. त्यांना माझी टीका झोंबते. पण मी शिवसेनेच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने बोलतोय”, असं राऊत म्हणाले.

“राज्य दोघांच्या भरवश्यावर अन् जनता वाऱ्यावर”; एकनाथ खडसेंचा राज्यसरकारवर हल्लाबोल

“सरकारनं पाकिटमारीतून बहुमत मिळवलं”

दरम्यान, या सरकारनं पाकिटमारीतून बहुमत मिळवल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. “सरकारने पाकिटमारीतून बहुमत प्राप्त केलं आहे. सरळमार्गाने नाही. इतिहासात याची नोंद राहील. एक घटनाबाह्य सरकार इथे आलं. या लोकांनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. भविष्यात त्यांना महाराष्ट्रासमोर या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील. आज त्यांना शिवसेना फोडल्याच्या गुदगुल्या होत आहेत. पण शिवसेना फोडणं इतकं सहज शक्य नाही. धमकी, दहशत, पैशाची आमिषं यातून हा पक्ष कधी फुटणार नाही. आम्ही सगळे उद्धव ठाकरेंसोबत आहोत”, असं राऊतांनी यावेळी सांगितलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *