Headlines

shivsena rebel mla sandipan bhumre challenged sanjay raut

[ad_1]

शिवसेनेतील बंडाळी, राज्यातील सत्तापालट आणि त्याअनुषंगाने होणारे आरोप-प्रत्यारोप या सगळ्या राजकीय महानाट्यानंतर आता भाजपाऐवजी बंडखोर आमदारांच्या गटासोबतच शिवसेनेचा कलगीतुरा रंगू लागला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांचे दावे खोडून काढत आरोप केले जात आहेत. आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरून चर्चा सुरू असतानाच भुमरे यांनी टीव्ही ९ शी बोलताना हा दावा फेटाळून लावला. यावेळी बोलताना भुमरे यांनी उलट संजय राऊतांनाच खुलं आव्हान दिलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊतांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रात सत्तास्थापनेनंतर संदीपान भुमरेंनी आपल्यासमोर लोटांगण घातल्याचा दावा केला होता. “संजय राठोड आदल्या दिवसापर्यंत माझ्यासोबत बसले होते. संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले, तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रेमानं त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो असं म्हणाले. हवं तर त्याचं व्हिडीओ फुटेज काढायला लावतो. सगळं आहे. संजय राठोड यांच्यावरच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. जे बोलत आहेत, त्यांना बोलू द्यात. आमचं मन साफ आहे”, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

“मी फक्त आभार व्यक्त केले”

दरम्यान, राऊतांच्या या विधानावर संदीपान भुमरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. “ज्या वेळी सत्ता आली, मी मंत्री झालो, तेव्हा त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी आमची भेट झाली. पण मी लोटांगण कशाला घेऊ? मी एक कार्यकर्ता आहे. ३५ वर्ष शिवसेनेसाठी झटलो. मंत्री झालो. मंत्री झाल्यानंतर फक्त आभार व्यक्त केले. लोटांगण घालण्याचा काही संबंध नाही”, असं भुमरे म्हणाले.

“संदिपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातलं होतं, हवं तर व्हिडीओ फूटेज काढतो”, संजय राऊतांचं टीकास्त्र

“मी काय लोटांगण घालणार आहे का? त्यांच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देण्याचं कारण नाही. रोज तेच तेच सुरू आहे. लोकांनाही आता ते ऐकायचा वीट आला आहे. संजय राऊत टीव्हीवर आले की लोक आता टीव्हीच बंद करत आहेत अशी परिस्थिती महाराष्ट्रात आली आहे. संजय राऊतांनीही आता शांत बसलं पाहिजे”, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला आहे.

संदीपान भुमरेंचं राऊतांना खुलं आव्हान

लोकांमधून निवडून येऊन दाखवावं, अशा शब्दांत भुमरेंनी राऊतांना आव्हान दिलं आहे. “टीका केली पाहिजे. पण कोणत्या पातळीवर जाऊन टीका करायची याला काही मर्यादा आहेत. आम्ही ३-४ लाख मतांनी निवडून आलो आहोत. आम्ही त्यांच्याप्रमाणे आयते निवडून आलेलो नाहीत. संजय राऊतांनी राजीनामा द्यावा आणि जनमतातून निवडून यावं. मग आम्ही त्यांना मानू. जनमतातून कसं निवडून यावं लागतं हे त्यांना कळेल”, असं भुमरे यावेळी म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *