Headlines

सूरतला गेलेल्या बंडखोर शिवसेना आमदाराचा खुलासा; म्हणाले “काहीच सामान घेतलं नव्हतं, अंगावरचे कपडे… | Shivsena MLA Sanjay Sirsat reavels went Surat without luggage and extra clothes Eknath Shinde Guwahati sgy 87

[ad_1]

शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी सूरतला गेलो होतो तेव्हा आमच्यातील अनेकांकडे सामान किंवा अतिरिक्त कपडे नव्हते असा खुलासा केला आहे. तसंच आपण कुठे चाललो आहोत याची कल्पनाही नव्हती असंही सांगितलं आहे. २१ जूनला एकनाथ शिंदेंसोबत सूरतमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला नवीन कपडे मिळाले अशी माहिती त्यांनी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसहित केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्यास सांगितलं तर जाणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

बंडखोर आमदार आधी सूरतला होते. यानंतर त्यांनी गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करत मुंबई गाठली. ३० जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला.

“आमदार सूरतसाठी निघाले तेव्हा त्यांच्याकडे गरजेपुरते कपडेही नव्हते. आम्ही एकनाथ शिंदेंना याबाबत सांगितलं तेव्हा, अक्षरश: हॉटेलमध्येच कपड्याचं दुकान सुरु करण्यात आलं. त्यानंतर आम्हाला नवीन कपडे मिळाले,” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. “आपण कुठे चाललो आहोत याची आपल्याला कल्पना नव्हती. आपले नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतंही सामान न घेता आम्ही निघालो”, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान

“आम्ही कुठे जात आहोत याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सोबत येण्यास सांगितलं होतं. आम्ही त्यांना काहीच विचारलं नाही आणि सोबत दिली. रात्री २ वाजता आम्ही सूरतमधील हॉटेलमध्ये पोहोचलो. पण एकाही आमदाराने सोबत अतिरिक्त कपडे आणले नव्हते,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

पण आमदारांनी एकनाथ शिंदे यांना आपल्या अडचणी सांगितल्या आणि सर्व काही सुरळीत झालं असंही त्यांना सांगितलं. ते म्हणाले की, “आम्ही याबद्दल एकनाथ शिंदे यांना सांगितलं, आणि दुसऱ्याच दिवशी कपड्यांनी भरलेल्या गाड्याच हॉटेलमध्ये आल्या. जणू काही हॉटेलमध्ये कपड्याचं दुकानच सुरु केलं होतं. यानंतर प्रत्येकाने आपल्या आवडीने कपडे घेतले. फक्त कपडेच नाही तर बूट आणि इतर गरजेचं सामानही उपलब्ध करुन देण्यात आलं. पण एकनाथ शिंदे यांना हवे तसे कपडे मिळाले नाहीत. त्यांचे कपडे नंतर ठाण्याहून सूरतला आले”.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *