Headlines

shivsena expelles ramdas kadam targets sharad pawar uddhav thackeray

[ad_1]

शिवसेनेत आत्तापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या पक्षफुटीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. आमदारांसोबत आता शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार-खासदारांनी पक्षावर, उद्धव ठाकरेंवर आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी रामदास कदम यांनी थेट शरद पवार आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.

“आयुष्याची संध्याकाळ अंधकारमय होईल असं वाटलं नव्हतं”

यावेळी बोलताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि आपल्या हकालपट्टीवर बोलताना कदम यांनी परखड शब्दांत टीका केली. “मी १९७० सालापासून गेली ५२ वर्ष शिवसेनेचं काम केलं आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारी शिवसेना या बाळासाहेब ठाकरेंच्या घोषवाक्याकडे आकर्षित होऊन मी पक्षाच्या कामासाठी झोकून दिलं आहे. माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं की माझ्यावर शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल. आमचं उतरतं वय आहे. माझं ७९ वय सुरू झालं आहे. आमच्या आयुष्याची संध्याकाळ पक्षाच्या माध्यमातून अंधकारमय होईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं”, असं रामदास कदम म्हणाले आहेत.

“तुम्ही कसली हकालपट्टी करता, मीच तुम्हाला…,” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका; खदखद मांडताना अश्रू अनावर

“मी उद्धव ठाकरेंना हात जोडून सांगितलं होतं की तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बसू नका. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासोबत संघर्ष करण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म संघर्ष केला. हिंदुत्व वाढवलं. आज सगळ्या जगात हिंदु ह्रदयसम्राट म्हणून बाळासाहेबांची ओळख आहे. साहेब गेल्यानंतर त्यांचा मुलगा त्याच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद स्वीकरतोय”, असं कदम यावेळी म्हणाले.

“मी उद्धव ठाकरेंना हे सांगून त्या दिवशी मी मातोश्रीवरून बाहेर पडलो, तो आजपर्यंत मातोश्रीची पायरी चढलो नाही. मला हे सहन झालं नाही. हा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांचा नाहीये. शरद पवारांनी शेवटी डाव साधला. आमच्या मनात भीती होती तेच झालं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की बाळासाहेब भोळे आहेत. बाळासाहेब भोळे नव्हते. उद्धव ठाकरे भोळे आहेत. शरद पवारांचा डाव उद्धव ठाकरेंना समजला नाही. आज शरद पवारांनी आमचा पक्ष फोडलाय”, असं रामदास कदम यावेळी म्हणाले.

“शरद पवार शिवसेना कशी फोडतायत, हे मी सांगितलं होतं”

दरम्यान, शरद पवार शिवसेना कशी फोडत आहेत, हे कागदपत्रांसह उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, असा दावा यावेळी रामदास कदम यांनी केला आहे. “मी मध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवार कोकणातल्या कुणबी समाजाला सोबत घेऊन शासनाचे ५ लाख रुपये देऊन शिवसेना कशी फोडत आहेत, हे मी जाहीरपणे सांगितलं होतं. सगळी कागदपत्रं एकनाथ शिंदेंकरवी उद्धव ठाकरेंकडे पाठवली होती. तेव्हा जरी उद्धव ठाकरेंनी नोंद घेतली असती, तर आज ना एकनाथ शिंदेंवर ती वेळ आली असती, ना ५१ आमदारांवर ती वेळ आली असती ना रामदास कदमसारख्या कडव्या शिवसैनिकाला राजीनामा द्यावा लागला असता”, असं रामदास कदम यावेळी म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *