Headlines

shivsena aaditya thackeray slams sanjay bangar on twitter

[ad_1]

शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा गट फुटून बाहेर पडला. या गटानं भाजपासोबत युती केली आणि राज्यात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी गटात असणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांकडून शिंदे सरकारवर आणि भाजपावर टीका केली जात असताना शिवसेनेकडून मात्र फुटून निघालेल्या शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केलं जात आहे. आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधीच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर तोंडसुख घेतलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मंगळवारी रात्री केलेल्या एका ट्वीटमधून बंडखोरी केलेल्या आमदारांना लक्ष्य केलं आहे. “काही गद्दार आमदारांची भाषा ऐकून प्रश्न पडतो की गुंडगिरी आणि सत्तेची नशा एवढी आहे का? की त्यांच्या नव्या पक्षाचा आणि सरकारचा अंकुश नाही?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

“जनतेला अशा भाषेत धमकावून काय सांगायचं आहे? हा सत्तेचा माज आहे की, काही न मिळाल्याचे नैराश्य?” असं देखील आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

संजय बांगर प्रकरणाची जोरदार चर्चा

हिंगोलीतील शिंदे गटाचे आमदार संजय बांगर यांनी स्थानिक मध्यान्न भोजन केंद्राच्या व्यवस्थापकालाच जेवणाच्या निकृष्ट दर्जावरून कानशिलात लगावली होती. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बांगर यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. मात्र, “असे प्रकार होत असतील तर मी कितीही वेळा कायदा हातात घेण्यास तयार आहे”, असं म्हणत बांगर यांनी आपल्या कृत्याचं समर्थन देखील केलं आहे.

‘५० खोके, गद्दार हाय हाय’, मुख्यमंत्री शिंदेंसमोर घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले “हे बेईमानांचं सरकार…”

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये शिंदे गट-भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी हा कलगीतुरा अजूनही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *