Headlines

शिवराई फाउंडेशनचा आरोग्य विषयक मार्गदर्शन उपक्रम

सोलापूर –  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जन्मउत्सव दिनानिमित्त शिवराई फाउंडेशन व श्री ब्रह्मा गायत्री विद्यामंदिर कनिष्ठ रानमसले यांच्या संयुक्त विद्यमाने रानमसले येथील हायस्कूलमध्ये  किशोरवयीन मुलीच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला .

ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलीच्या आरोग्याबद्दल ज्या अनेक समस्या असतात त्या समस्या वरती कशा प्रकारे मार्ग काढता येतो त्या समस्यांना आपण कशा प्रकारे तोंड द्यायचं या विषयावर डॉक्टर रूपाली कुलकर्णी यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच घरामध्ये आई ज्या विषयावर ती बोलत नाही हा विषय डॉक्टर मॅडमनी व्यवस्थितपणे हाताळून मुलींना मार्गदर्शन केले.

 यावेळी  संस्थेचे प्राचार्य श्री महादेव गवळी , शिवराई फाउंडेशन चे सदस्य सौ.रोहिणी गरड सौ.अनुराधा शिंदे सौ.सुजाता , गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फडके सर यांनी केले . शिवराई फाउंडेशन चे प्रभाकर गायकवाड ,नंदकुमार गरड  विष्णू पाटील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी कष्ट घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *