Headlines

Shane Warne Funeral | शेन वॉर्नला अखेरचा निरोप, क्रिकेटपटूंना अश्रू अनावर

[ad_1]

कॅनबेरा :  फिरकीचा जादूगार ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचं (Shane Warne Funeral) काही दिवसांपूर्वी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. या दिग्गज खेळाडूला आज  (20 मार्च) मेलबर्नमध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. वॉर्नच्या अंत्यसंस्काराला जगभरातील क्रिकेटपटू आणि त्याचे चाहते उपस्थित होते. आपल्या सहकाऱ्याला निरोप देत असताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. वॉर्नच्या अखेरच्या क्षणाची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. (australia former legendary spinner shane warne funeral emotional scenes as warne 3 children kiss his coffin and break down in tears)

शेन वॉर्नचं काही दिवसांपूर्वी 4 मार्चला थायलंडमध्ये निधन झालं. वॉर्न मित्रांसोबत थायलंडला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. तेथे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं.

वॉर्नला दिग्गजांकडून श्रद्धांजली

वॉर्नला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी श्रद्धांजली वाहिली. यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, ग्लेन मॅकग्रा, मर्व ह्यूजेस, इयान हीली आणि मार्क वॉसह 80 क्रिकेटपटू उपस्थित होते. 

दरम्यान 30 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर वॉर्नला राजकीय सन्मानासह अंतिम निरोप दिला जाईल. यावेळेस सामान्य लोकांना येण्याची परवानगी असेल. त्याच्या सन्मानार्थ मैदानावरील एका स्टँडला वॉर्नचे नाव देण्यात येणार आहे.

शेन वॉर्नची क्रिकेट कारकिर्द 

शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने 37 वेळा 5 विकेट्स तर 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एका कसोटी सामन्यात 128 धावा देऊन 12 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती.   

तर 194 वनडे मॅचमध्ये त्याने 293 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. वॉर्नची वनडेमधील 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *