Headlines

शाहरूखच्या अडचणीत वाढ, सुनावणीकरता न्यायालयात व्हावं लागणार हजर

[ad_1]

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरूख खान वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. म्हणजे कधी मुलगा आर्यन खानचं ड्रग्स प्रकरण असो किंवा लता दीदी यांच्या अंत्यसंस्कारावेळी केलेली ती कृती असो. आता पुन्हा एकदा शाहरूख खान अडचणीत सापडला आहे. (ShahRukh Khan High Court) 

शाहरूख खान विरोधात तक्रार नोंदवण्याच्या मागणीकरता गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे.

शाहरूख खान २०१७ साली ‘रईस’ या सिनेमाच्या प्रमोशनकरता वडोदरा रेल्वे स्थानकावर गेला होता. यावेळी प्रमोशन दरम्यान शाहरूखने आपले टी शर्ट गर्दीत फेकले. यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 

तसेच 23 जानेवारी 2017 रोजी झालेल्या गोंधळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि दोन पोलीस कोसळले होते. स्थानिक काँग्रेस सदस्य जितेंद्र सोलंकी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. 

 त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. शाहरुखच्या विरोधात आयपीसी कलम लागू करण्यात आला होता.

हायकोर्टाने तक्रारदाराला ही सुनावणी संपवायची आहे का, अशी विचारणा केली आहे. कोर्टाने असेही म्हटले आहे की ते या प्रकरणी अभिनेत्याला माफीनामा पाठवण्याचे आदेश देऊ शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे.

शाहरूख खानचे वकील मिहीर ठाकोर यांनी ठामपणे सांगितले की मृत्यू झालेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास होता. त्याच्या कुटुंबीयांनीही ते मान्य केले होते. 

त्यांनी युक्तिवाद केला की या प्रकरणात फक्त आयपीसीचे कलम 336 आहे. ज्यामध्ये तीन महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा 250 रुपये दंड किंवा दोन्ही आहेत. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *