शाहरुखचा राग करताय ? आधी त्याचा हा व्हिडीओ पाहा मग ठरवा काय म्हणायचंय


मुंबई : तेलुगू सुपरस्टार  महेश बाबू (Mahesh Babu) यानं काही दिवासंपूर्वीच मी बॉलिवूडला परवडणारा नाही त्यामुळं मी या कलाजगतात काम करत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानं काही बॉलिवूड कलाकार या मुद्द्यावर व्यक्त झाले. काहींनी या दाक्षिणात्य सुपरस्टारला धारेवर धरलं. (Mahesh babu on Bollywood )

महेश बाबूच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं कलाजगतामध्ये दोन गट पडलेले असतानाच एकाएकी अभिनेता शाहरुख खान याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे.

मुख्य म्हणजे जी मंडळी शाहरुखचा राग करतात किंवा ज्यांना शाहरुख आवडत नाही ते सर्वसुद्धा हा व्हिडीओ पाहून त्याच्या प्रेमात पडतील. 

हिंदी चित्रपटसृष्टीत अमाप गाजलेला तरी हॉलिवूडमध्ये अद्यापही पदार्पण न करु शकलेला हा अभिनेता या व्हिडीओमध्ये आपण परदेशातील इंडस्ट्रीमध्ये, अर्थात हॉलिवूडमध्ये नेमकं का नाही गेलो हे सांगताना दिसत आहे. (Shah Rukh Khan)

हॉलिवूडमध्ये काम करण्याचा काही बेत आहे का असं विचारलं असता, 14 वर्षे जुन्या या व्हिडीओमध्ये तो म्हणताना दिसतोय, ‘माझं इंग्रजी फारसं चांगलं नाही. कोणा एका व्यक्तीला बोलता येत नाही अशी एखादी भूमिका मला मिळाल्यास ती मी साकारेन. मी आता 42 वर्षांचा आहे, काहीसा सावळा आहे… अभिनेता म्हणून माझी काही युएसपी नाही. मला काही कुंग फू वगैरे येत नाही. लॅटिन सालसा वगैरे येत नाही, हो आणि मी उंचही नाहीये.’

तुम्ही ज्या इंडस्ट्रीला ड्रीम फॅक्ट्री असं म्हणता तिथं माझ्यासाठी कोणतीही जागा नाही. कारण माझ्यात तितकं कौशल्यही नाही. त्यामुळं आता आणि यापुढंही मला माध्या देशात (भारतातच) काम करायची इच्छा आहे, असं म्हणत जगाच्या कानाकोपऱ्याच भारताचं नाव नेण्याचा मनसुबा त्यानं बोलून दाखवला. Source link

Leave a Reply