शाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?


Celebs Income: सुपरस्टार शाहरुख, सलमान आणि आमिर या खान अभिनेत्यांनी बॉलिवूडवर (Bollywood) अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं आहे. या तिघांनी अनेक सुपरहिट चित्रपट (Superhit Movies) दिले. गेल्या 25 वर्षांपासून हिंदी सिनेमासृष्टीवर राज्य करणारे हे अभिनेते बॉलीवूड इंडस्ट्रीतले प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या (Richest Actor in Bollywood) यादीत या तीन अभिनेत्यांचं स्थान नेहमीच वरचं राहिलं आहे. 

शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात. ते कसे रहातात, कोणते कपडे घालतात, त्यांची हेअरस्टाईल, त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. पण या तीन खानमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. 

बॉलिवूडचा किंग खान
आपण सुरुवात करुया बॉलिवूडमध्ये किंग खान (King Khan) नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुख खान (shahrukh khan) पासून. एका रिपोर्टनुसार शाहरुख बॉलिवूडचा सर्वाधिक महागडा अभिनेता आहे. त्याची एकूण संपत्ती  5 हजार 593 करोड असल्याचं सांगितलं जातं. मुंबईतल्या वांद्रे इथल्या शाहरुखच्या मन्नत बंगल्याचा (Mannat Bunglow) समावेश जगातील टॉप 10 बंगल्यांमध्ये होते. 1995 मध्ये शाहरुखने हा बंगला 13 कोटी रुपयांना विकत घेतला होता. आज त्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय शाहरुखचा दुबईत अलिशान बंगला असून लंडनमधल्या पार्क लेन इथेही त्याचं घर आहे. अलिबागमध्ये शाहरुखचा प्रशस्त फार्महाऊस आहे. त्याची चित्रपट निर्मिती कंपनीदेखील आहे. याशिवाय आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तो सहमालक आहे. 

बॉलिवूडचा भाईजान
बॉलिवुडचा भाईजान (Bhaijan) म्हणून अभिनेता सलमान खानला (Salman Khan) ओळखलं जातं. सध्याच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सलमान खान टॉपवर आहे. सलमानची एकूण संपत्ती 360 मिलियन डॉलर म्हणजे  2900 कोटी रुपये इतकी आहे. सलमान मुंबईत रहात असलेल्या घराची किंमत 115 कोटींपेक्षा जास्त असल्याचं बोललं जातं. याशिवाय दिल्ली आणि नोएडातही त्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे. पनवेलमध्ये त्याचा अलिशान फार्महाऊस आहे. आपला बराच वेळ सलमान या फार्महाऊसवर घालवतो. याशिवाय जाहीराती आणि टीव्ही शोद्वारेही तो वर्षाला जवळपास 250 ते 300 कोटींची कमाई करतो. सलमानला महागड्या गाड्यांचा छंद आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट
मिस्टर परफेक्शनिस्ट (Mister Perfectionist) म्हणून आमिर खानला (Aamir Khan) बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं. निवडक चित्रपटातच आमिर खान काम करतो. हिंदी चित्रपटसृष्टीला आमिर खानने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमिर खानची एकूण संपत्ती  225 मिलियन डॉलर म्हणजे 1800 कोटी रुपये आहे. आमिर खान मुंबईतल्या पाली हिलमधल्या हिल व्ह्यू अपार्टमेंटमध्ये रहातो. पाचगणी या हिल स्टेशनवर त्याचा अलिशान बंगला असून त्याची किंमत जवळपास 15 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये त्याचं वडिलोपार्जित घर आणि शेती आहे. अमेरिकेत्या बेव्हरली हिल्समध्ये 75 कोटींचा बंगलाही त्याच्या नावावर आहे. त्याचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊसही आहे. जाहीरातीमधूनही आमिर कोटींची कमाई करतो. 

या तिघांच्याही कमाईच्या आकडेवारीवर नजर टाकली तर शाहरुख खान श्रीमंतीच्या बाबतीत सर्वात टॉपवर आहे.Source link

Leave a Reply