Headlines

शबाना आझमी- जावेद अख्तर यांना स्वत:चं मूल का नाही? अखेर कारण समोर

[ad_1]

मुंबई : हिंदी सेलिब्रिटी वर्तुळात काही असे कलाकार आहेत ज्यांनी फक्त त्यांच्या कलेच्या माध्यमातूनच नव्हे, तर त्यांच्या जगण्यातूनही अनेकांनाच आदर्श दिला आहे. अशा कलाकारांच्या विशेष म्हणजे कलाकार जोड्यांच्या यादीत येणारं नाव म्हणजे शबाना आझमी आणि जावेद अख्तर. (Bollywood reason why shabana azmi and javed akhtar dont have own child)

शबाना आणि जावेद यांनी त्यांच्या नात्यानं कायमच प्रेमाची आणि या नात्याची वेगळी परिभाषा सर्वांपुढे ठेवली. पण, त्यांच्या या नात्यात कायमच एका गोष्टीची कमतरता दिसून आली. (shabana azmi and javed akhtar)

ही कमतरताही अशी, जी आजवर भरून निघालेली नाही. मुळात या एका गोष्टीमुळं जावेद अख्तर आणि शबाना यांच्या नात्यावरही परिणाम झाले असते. पण, दोघांचाही समजुतदारपणा आणि नात्यांच्या परिपक्वतेमुळे नात्याला हे नकोसं वळण मिळालंच नाही. 

शबाना आणि जावेद या दोघांनाही स्वत:चं मुल नाही. फरहान आणि झोया, ही जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलं. एका मुलाखतीत आपल्याला स्वत:चं मूल नसण्यामागचं कारण खुद्द आझमी यांनी सांगितलं होतं. 

काही वैद्यकीय कारणं आणि अडचणींमुळं आमची मुलं होऊ शकली नाहीत, असं सांगत आपल्याला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मन हेलावून गेलं होतं असं त्या म्हणाल्या. 

या बातमीनं नातं बदलणं स्वाभाविक होतं. पण, शबाना आणि जावेद मात्र याला अपवाद ठरले. दोघांचंही व्यक्तीमत्त्वं विभिन्न असतानाही त्यांनी हे वैवाहिक आयुष्य आणखी आनंददायी केलं. मुलं नसली तर काय झालं, ती बाबच मागे टाकत अख्तर आणि त्यांच्या पत्नीनं सहजीवनाचा प्रत्येक क्षण संस्मरणीय केला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *