Headlines

सत्तर लाख शेतकऱ्यांकडून पीकविमा ; चोवीस तासांत साडेपाच लाख अर्ज; शेवटचे दोन दिवस शिल्लक

[ad_1]

पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामातील पिकांसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यातील ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. विमा काढण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या चोवीस तासांत विक्रमी ५ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अखेरच्या दोन दिवसांत विमाधारक शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी भर पडून एकूण आकडा ८४ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाचे राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांनी आपला विमा हप्ता भरून पीकविमा घेतला आहे. विभागनिहाय आकडेवारी पाहता औरंगाबाद विभाग आघाडीवर असून, सर्वाधिक २३ लाख ८३ हजार ९०४ शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे. त्या खालोखाल लातूर विभागात २९ लाख १३ हजार ३९ शेतकऱ्यांनी,  पुणे विभागातील २४ लाख २३२ शेतकऱ्यांनी, नाशिक विभागातील २२ लाख  १ हजार ८४८ शेतकऱ्यांनी, नागपूर विभागातील २० लाख ४८९ शेतकऱ्यांनी, अमरावती विभागात १० लाख ३१ हजार ३९३ शेतकऱ्यांनी आणि सर्वात कमी कोकण विभागातील ५९ हजार ९३७ शेतकऱ्यांनी आपला हप्ता भरून विमा काढला आहे.

४१ लाख ५४ हजार १६६ हेक्टर क्षेत्र संरक्षित

अर्ज केलेल्या ७० लाख ६३ हजार ४१९ शेतकऱ्यांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या  २९ लाख  २३ हजार ३८२ असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या  ६७ लाख ७१ हजार ३७ इतकी आहे. या शेतकऱ्यांनी ४१ लाख ५४ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावरील पीक विमा घेऊन संरक्षित केले आहे. एकूण संरक्षित विमा रक्कम  २०२८६.४३ कोटी रुपये इतकी असून, एकूण विमा हप्ता ३२७२.२२ कोटी रुपये इतका आहे. त्यात शेतकरी जमा हप्ता ४६४.२० कोटी रुपये, राज्य सरकारचा वाटा १४०५.०४ कोटी रुपये आणि केंद्र सरकारचा वाटा १४०२.९८ कोटी रुपये इतका आहे.

केंद्र सरकारचे पीकविमा संकेतस्थळ आणि राज्याचे महाभूमी अभिलेखचे संकेतस्थळ व्यवस्थित चालल्यामुळे शेतकरी सरकारी सुटीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतरही विमा काढू शकले. मागील २४ तासांत साडेपाच लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, इतक्या मोठय़ा क्षमतेने ऑनलाइन काम सुरू आहे.

विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी विभाग

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *