स्वत:चं प्रतिबिंब पाहून मंत्री एकनाथ शिंदेही भारावले ; एकटक पाहत राहिले आणि…..


मुंबई : अभिनेता प्रसाद ओक याची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या Dharmaveer  या चित्रपटानं सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीचं कुतूहल निर्माण केलं आहे. प्रवीम तरडे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटातून जनमानसातील नेत्याचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. (Prasad oak)

दिघे यांच्या कामाची दखल घेत, नागरिकांच्या आणि विशेष म्हणजे ठाणेकरांच्या मनात असणारं त्यांचं स्थान नेमकं कसं आणि किती होतं हे सर्वकाही या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. 

राजकारणाच्या चाकोरीतून बाहेर पडत, परिस्थितीलाही आपल्या निर्णयांपुढे नमवत  दिघेसाहेबांनी आपल्या कामाचा गाडा पुढे नेला. यामध्ये त्यांना साथ होती ती विश्वासाह्र कार्यकर्त्यांची, नव्हे तर आपुलकीच्या माणसांची. 

आनंद दिघे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणजे सध्याच्या घडीला राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपटी असणारे एकनाथ शिंदे. शिंदे आणि दिघेसाहेब यांच्यात नेमकं नातं काय होतं याची झलक नुकतीच चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 

यावेळी शिंदे यांच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. अभिनेता क्षितीज दाते यानं शिंदेंची भूमिका साकारली आहे. त्यानं त्यांच्या बोलण्याचालण्याच्या शैलीपासून ते अगदी वेशभूषेची जबाबदारी चांगलीच निभावली आहे. 

चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये जेव्हा शिंदेंसमोर क्षितीज त्यांच्याच रुपात आला, तेव्हा क्षणार्धासाठी त्यांचे डोळेही चमकले. 

आपण जे पाहतोय ते सत्य आहे ना? असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. यावेळी जेव्हा प्रसाद ओकनं आनंद दिघे यांच्या रुपात प्रवेश केला तेव्हा तर शिंदेंनी वाकून त्याला नमस्कार केला. 

एका नेत्याप्रती असणारा इतका आदर पाहता, या नेत्याची लोकप्रियता किती होती याचा अगदी सहज अंदाज लावता येत आहे. Source link

Leave a Reply