‘माझ्या कुटुंबाला…’, विकीसोबत Secret Wedding करण्यावर Katrina चा खुलासा


Katrina Kaif on Her Secret Wedding With Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि पती विकी कौशल (Vicky Kaushal) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. कतरिना आणि विकी 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न बंधनात अडकले होते. (Karina-Vicky Marriage)  त्या दोघांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे सप्तपदी घेतल्या होत्या. विकी आणि कतरिनाच्या मेहंदी पासून त्यांच्या लग्नातील हटके सेलिब्रेशनपर्यंत सगळ्यात गोष्टी चर्चेत होत्या. त्या दोघांनी सिक्रेट वेडिंग का केलं असा प्रश्न सगळ्यांना होता, आज त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं त्या मागचं कारण जाणून घेऊया… 

पाहा काय म्हणाली कतरिना –

कतरिना आणि विकीनं गुपचूप म्हणजेच (Secret) लग्न करण्याचा निर्णय घेतला. फिल्मफेअर अवॉर्ड्स दरम्यान कतरिनाला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी कतरिना म्हणाली, सिक्रेट ठेवण्यापेक्षा आम्ही आम्ही कोविडच्या नियमांमुळे बांधलेले होतो. तर झूमशी बोलताना कतरिना म्हणाली, माझ्या कुटुंबालाच कोविडचा फटका बसला आहे आणि आपण सर्वजण ते गांभीर्याने घेत नाही.

हेही वाचा : Video : हे घर आहे की राजमहल… खिलाडी Akshay Kumar चं रॉयल घर

दरम्यान, विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस हा हिल्समध्ये व्यथित करत आहेत. कतरिनानं काल त्याचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. या फोटोमध्ये कतरिनानं स्वेट शर्ट परिधान केलं आहे. त्या स्वेट शर्टवर फुलांच्या प्रिंट आहे. तर कतरिनाचे हे फोटो विकीनं काढले आहेत. कतरिना विक यांनी ते ज्या ठिकाणी फिरायला गेले आहेत ती जागा देखील खासगी ठेवली आहे. त्या दोघांना एकमेकांसोबत वेळ एकांतात वेळ व्यथित करायचा आहे. (katrina kaif and vicky kaushal wedding anniversary actress reveals the reason of doing secret marriage)

कतरिना सगळ्यात शेवटची इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘फोन भूत’मध्ये दिसली होती. लवकरच ती सलमान खान आणि इमरान हाश्मीसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय विजय सेतुपतीसोबत ‘मेरी ख्रिसमस’ आणि आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटातही ती दिसणार आहे. तर, विकी कौशल लवकरच ‘गोविंदा नाम मेरा’ मध्ये कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि सारा अली खानसोबतचा अद्याप शीर्षक नसलेला चित्रपटही येणार आहे.  Source link

Leave a Reply