Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : वहिनी मॅच पाहिली का? ऋतुराजच्या खेळीनंतर सायलीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव


Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : सध्या क्रिकेटर ऋतुराज गायकवाड चर्चेत आहे. ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 7 सिक्स लगावत त्याच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ऋतुराज आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव यांच्या रिलेशनशिपच्या सुरु झाल्या आहेत. ऋतुराजचा खेळ पाहताच नेटकऱ्यांनी सायलीच्या पोस्टवर कमेंट करत वहिनी मॅच पाहिलीत का असा सवाल केला आहे. 

सायलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. सायलीच्या पोस्टचा आणि ऋतुराच्या विजय हजारे ट्रॉफीतल्या कमाली खेळीचा काहीही साम्य नाही. तरी सुद्धा नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘मॅच बघितली का वहिनी, काय बॅटिंग केलीय आमच्या भावानं?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘6,6,6,6,6,6 NB, 6 – ऋतुराजचे सात षटकार एकाच ओव्हरमध्ये’. तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आज माझ्या मित्रानं ऋतुराज गायकवाडनं 6,6,6,6,6,6, 6 सिक्स मारले 7, भारी बॅटिंग केली’. आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऋतू का राज’.

Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad Rumored Girlfriend Sayali Sanjeev netizens commented on actress post

एकाच षटकात 7 षटकारांसह 43 धावा केल्या. एका षटकात 7 षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्यानं दुहेरी शतकही झळकावले. ऋतुराज गायकवाडने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी सायली संजीवने यावर मौन सोडत रिलेशनशिपबद्दल भाष्य केले होते.

Relationship च्या चर्चांवर काय म्हणाली सायली संजीव –

सायलीनं रिलेशनशिपबद्दलच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले. ‘मी आणि तो फार चांगले मित्र आहोत. खरं सांगायचं तर आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र आहेत. त्यातील एक रॉयल चॅलेंजर बँगलोर, ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज, तुषार देशपांडे हा पण चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आहे. पण हे सर्वजण माझे खरंच खूप चांगले मित्र आहेत. त्यांना माझी काही दिया परदेस ही मालिका फार आवडायची. ते ती मालिका बघायचे. मला ही गोष्ट कळल्यानंतर मी जरा चकितच झाले. क्रिकेटपटू ही मालिका का बघतात हेच मला कळत नव्हते. एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत’, असे तिने उत्तर यावेळी दिले.

हेही वाचा : Maharashtrachi Hasyajatra ‘अवली लवली कोहली’ गाणं सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ, Video नक्कीच पाहा

सायलीच्या या उत्तरानंतर त्या दोघांचे रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही याबद्दल अजूनही चाहत्यांना शंका आहे. पण तिने मात्र यावर टाळाटाळ केली आहे. दरम्यान सायली ही काही दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी ती हर हर महादेव या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारत होती. त्याबरोबरच तिची प्रमुख भूमिका असलेला गोष्ट एका पैठणीची हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.Source link

Leave a Reply