आता दादा ची दादागिरी दिसणार रुपेरी पडद्यावर

भारतात जेव्हा कधी क्रिकेटचा विषय निघेल तेव्हा सौरभ गांगुली यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जाईल. भारतीय क्रिकेट संघाला मजबूत बनवण्याचे श्रेय दादाला जाते. एक कमकुवत संघापासून एक जागतिक विजेता संघ बनवण्यामध्ये दादांन इतकी मेहनत क्वचितच कोणी केली असेल. सौरभ गांगुली सध्या बीसीसीआयचे प्रमुख आहेत. तशातच ते क्रिकेट साठी सतत काम करत आहेत. आता त्यांच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. याची माहिती स्वतः सौरभ गांगुली ने ट्विट करून दिली आहे. दादाचं हे ट्विट खूप वेगाने वायरल होत आहे.

दादांनी ट्विटर वर लिहिले आहे की क्रिकेट हे माझे आयुष्य आहे. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला आहे. क्रिकेटने क्षमता दिली आहे जा कारणाने मी मान उंचावून पुढें जाऊ शकतो. आठवण करून देता येइल असा हा प्रवास आहे. लव फिल्स माझ्या प्रवासावर चित्रपट घेऊन येत आहे. या गोष्टीने मी खूप खुश आहे.

बायोपिक मध्ये सौरभ गांगुली यांची भूमिका कोण साकारणार याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही आहे. परंतु एका वाहिनीवर बोलताना दादाने सांगितले होते की माझ्या जीवनावर बायोपिक बनवली गेली तर माझी इच्छा आहे माझी भूमिका अभिनेता ऋतिक रोशन यांनी साकारावी.

Leave a Reply