Headlines

Sara Tendulkar कडून आपल्या प्रेमाची कबुली, म्हणाली…

[ad_1]

मुंबई : माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर याला सगळेच ओळखतात. त्यामुळे क्रिकेटच्या या देवाबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु आता चर्चा होतेय ती सचिनची मुलगी सारा तेंडूलकरची. सारा तेंडूलकरने आपल्या सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. साराचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. सारा नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. ज्यामुळे ती काय करते, कुठे जाते? हे सगळं तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचते.

सध्या साराने मॉडलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केलं आहे.

सध्या सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेकदा सारा शुभमन गिलसोबत दिसली देखील आहे. परंतु या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कधीही दुजोरा दिलेला नाही. परंतु त्यांच्या चाहत्यांना ही जोडी फार आवडते.

सारा आणि शुभमनच्या नात्याच्या चर्चांदरम्यान साराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये साराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. ज्यामुळे ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली.

तुम्हाला असं वाटत असेल की, यामध्ये साराने शुभमन गिलबद्दल आपल्या प्रेमाची कबुली दिली असावी, परंतु तसे नाही. ही पोस्ट साराने काही महिन्यांपूर्वी केली होती. ज्यामध्ये तिने आपल्या आईसोबत फोटो शेअर केला होता. ज्याला कॅप्शन देताना साराने आपल्या आईवरील प्रेमाची कबुली दिली आहे.

साराने आपल्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला, ज्याला कॅप्शनमध्ये लिहिलं की, जिथे ती आहे तिथे घर आहे. Happy Birthday to my mama, best friend I love you.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *