Headlines

संभव फाऊंडेशन व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात ३ हजार रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 


शहर प्रतिनिधी /सोलापूर  – आज जगभरात कोरोना विषाणू ची महामारी सुरू असताना लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडत आहेत, सर्वत्र शासनाने लागु केलेल्या संचारबंदी मुळे होतकरू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली असून यात कष्टकरी विडी कामगार, घरेलू कामगार महिला, फेरीवाले, बांधकाम कामगार समूहाचे पण तितकेच हाल होताना दिसत आहेत.


सोलापूर शहरातील तळागाळातील गरीबां पर्यंत मदत पोहचुन सेवा पुरवणारी संभव फाऊंडेशन गेल्या काही दिवसांपासून लॉक डाउनच्या काळात कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेत ही अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे कार्य सुरू ठेवले असून या मध्ये आटा, डाळ, तेल, साखर, हळद, मीठ व मास्क असे जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून पोटाची खळगी भरण्यासाठी दोन हातांशी धडपडणाऱ्या सोलापूर शहरातील  तीन हजार चारशे होतकरू, कष्टकरी गरजवंताना सदर किट चे वाटप करण्यात आले. 

हे रेशन किट जुने विडी घरकुल, नवीन विडी घरकुल कुंभारी, मुळेगाव, कुमठे, दोड्डी, बेलाटी, मिलींद नगर, एस.टी बस स्टँड, जुना बोरामणी नाका, गांधी नगर, रविवार पेठ, मोदी, सुत मिल, हब्बु वस्ती, माने वस्ती, जवळकर वस्ती, रमाबाई आंबेडकर नगर, भवानी पेठ, आंबेडकर नगर कर्णिक नगर, मड्डी वस्ती, जय मल्हार चौक,सलगर वस्ती,बाळे,पुर्वभाग आदी ठिकाण या रेशन किटचे वाटप करण्यात आले. सदर रेशन किटचे पुजन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे डॉक्टर अँन्ड पेशंट गॕलेरीचे ब्रिजेश कासट,सपना रांभीया हैद्राबादवाले प्रविण गाडेकर यांच्या हस्ते झाले.तर

रेशन किटचे वाटप रिलायन्स फाउंडेशनचे व्यवस्थापक संदीप गुंजाटे, रिलायन्स फाउंडेशन राज्य समन्वयक दिपक केकान रिलायन्स फाउंडेशन सोलापूरचे समन्वयक श्रीकांत कोळी यांच्या माध्यमातून झाले. यावेळी संभव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण, सचिवा राणी सिरसट उपस्थित होत्या.


जीव मुठीत चार भिंतीत बसण्याची वेळ आली असताना संभव फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांनी चार भिंतीच्या बाहेर पडत माणुसकी जोपासत सदर किट चे वाटप केले. किट वाटप करण्यासाठी रुपाली हूंडेकरी, आरती लांडे, आस्मिता गायकवाड, वृषाली गायकवाड,आकाश बनसोडे,भाग्यश्री सोनवणे, प्रा.पवन व्हनकवडे, प्रा.गणेश पवार, सचिन शिंदे, राज पवार, चेतन लिगाडे,विश्वजीत बनसोडे,अमीर दोडोती,संतोष माने, राहुल सिरसट,अक्षय चंदनशिवे,बुद्धराज ढेपे यांनी मोलाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *