समंथाच्या निर्णयानं Ex Husband नागा चैतन्यच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; आता तिनं थेट…


मुंबई : दाक्षिणात्य कला जगतातील बहुचर्चित सेलिब्रिटी जोडी म्हणून अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्याकडे पाहिलं गेलं आहे. अफेअरपासून ते अगदी लग्नापर्यंत प्रत्येक वेळी या जोडीचं सुंदर नातं सर्वांपुढे आलं. पाहता पाहता हे नातं बहरलं, पण, अचानकच कोणाची दृष्ट लागली आणि समंथा, नागा चैतन्य यांच्यामध्ये दुरावा आला. (Samantha, Naga Chaitanya)

थेट घटस्फोटाच्याच निर्णयावर ही जोडी धडली आणि चाहत्यांना धक्काच बसला. समंथा आणि नागा असं काहीतरी करतील याची कोणालाही अपेक्षा नव्हती. 

पण, व्हायचं तेच झालं. सुरुवातीला दुरावा, त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंटवरून पतीचं नाव हटवणं आणि एके दिवशी या दोघांनीही घटस्फोटाची घोषणा करणं हे कळण्यापलीकडलं होतं. 

आजपर्यंत त्यांच्या नात्यातून विभक्त होण्याचं मूळ कारण समोर आलेलं नाही. किंबहुना ते जाणीवपूर्वक लपवनण्यात येताना दिसतं. 

एकिकडे नात्यातील या आघातानं उन्मळलेल्या समंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आता कुठे ही जोही सावरतानाही दिसली. पण, राहिल्यासाहिल्या आठवणीही यांना नकोशा झाल्या आहेत.

म्हणे समंथानं आता तिची लग्नातील साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला परत केली आहे. 

त्याच्या कुटुंबासाठी हा अर्थातच एक मोठा धक्का आहे. कारण, कुठे हे नातं पूर्वपदावर येण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतानाच समंथानं हा टोकाचा निर्णय घेतला. 

त्याच्याशी संबंधीत कोणतीही गोष्ट आपल्यासोबत न ठेवण्याचं तिनं ठरवलं असल्याची माहिती समंथाच्या निकटवर्तीयांनी दिली. 

नातं तुटल्यानंतर सर्वात वेदनादायी काही असेल तर त्या याच आठवणी. आपण कितीही सावरायचा प्रयत्न केला, तरीही या आठवणी मात्र आपल्याला सावरु देत नाहीत. म्हणूनच की काय समंथानं या आठवणींपासूनही दुरावा पत्करल्याचं स्पष्ट होत आहे. Source link

Leave a Reply