Headlines

सज्ज व्हा! लिजेंड्स पुन्हा मैदानात, पुन्हा चौकार षटकारांची आतिषबाजी

[ad_1]

LCL 2022: लीजेंड्स क्रिकेट लीगचा (legends cricekt league 2022) दुसरा हंगाम यंदा भारतात खेळवला जाणार आहे. 16 सप्टेंबरला एका विशेष सामन्याने स्पर्धेची शानदार सुरुवात होईल. त्यानंर 17 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत भारतातील सहा शहरात या स्पर्धेतील सामने खेळवले जातील. 

स्पर्धेचा विशेष सामना क्रिकेट कोलकाताच्या ईडन गार्डनवर (eden garden stadium) खेळवला जाणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी तो सामना खास असेल. इंडिया महाराजा  (India Maharaja) आणि वर्ल्ड जायंट्स दरम्यान हा साम(World Giants Team) ना रंगणार आहे. 

LCL मध्ये यंदा दहा देशांचे खेळाडू भाग घेणार आहेत. स्पर्धेची सुरुवात 17 सप्टेंबरपासून होणार असून यंदा चार संघ एकमेकांना भीडणार आहेत. चार संघात एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे यंदाची स्पर्धा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाला समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटचे आयुक्त रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ही माहिती दिली आहे. 

पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश?
गेल्या वर्षी या स्पर्धेत तीन संघ सहभागी झाले होते. यात इंडिया महाराजा, वर्ल्ड जायंट्स आणि एशिया लायंस (Asia Lions) या संघांचा समावेश होता. त्यावेळी एकूण सात सामने खेळवण्यात आले होते. यावर्षी यात एका संघाची वाढ झाली असून चार संघ सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी एशिया लायंस संघातून पाकिस्तानचे (Pakistan) माजी क्रिकेटरही खेळले होते. यावर्षीही त्यांचा संघात समावेश असण्याची शक्यता आहे. अशाच सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे भारत सरकार पाकिस्तानी खेळाडूंना वीजा देणार का? शोएब अख्तर, मिसबाह उल हक, शाहिद आफ्रिदी हे पाकिस्तानी खेळाडू खेळण्याची शक्यता आहे.

चार संघांचा समावेश
कोलकाता, दिल्ली, जोधपूर, कटक आणि राजकोट या शहरात स्पर्धेचे 15 सामने खेळवले जाणार आहेत. 16 तारखेला होणाऱ्या विशेष सामन्यात इंडिया महाराजा संघाचं नेतृत्व सौरव गांगुली (sourav ganguly) करणार आहे. तर वर्ल्ड जायंट्स संघाची धुरा इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनवर (ian morgan) असणार आहे. 

असे असणार संघ
इंडिया महाराजा: सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, मोहम्मद कैफ, यूसुफ पठान, एस बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंत, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह , जोगिंदर शर्मा।

वर्ल्ड जाएंट्स: इयान मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमंस, हर्शल गिब्स, जॅक्स कैलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मैकुलम, जॉन्टी रोड्स, मुथैया मुरलीधरन, डेल स्टेन, हैमिल्टन मसाकाद्जा, मुशरफे मुर्तजा, असगर अफगान, मिशेल जॉनसन, ब्रेट ली , केविन ओ’ब्रायन, दिनेश रामदीन।



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *