सगळेच हादरले, लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीला कॅन्सरची लागण, ‘तो’ फोटो डोळ्यात पाणी आणणारा


मुंबई : कोणत्याही कठीण प्रसंगात तुमच्या जोडीदाराची साथ ही कायम महत्वाची ठरते. कधी कधी आपल्या आयुष्यात असा कठीण काळ येतो. ज्याबद्दल आपण कधीच विचार केलेला नसतो. पण तेव्हा मिळालेली जोडीदाराची साथ तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची ताकद देतं. असंच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीच्या जोडीदारासोबत झालं आहे. 

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या पतीला कॅन्सरची लागण झाली आहे. मेहुल पैसोबत अभिज्ञाने ६ जानेवारी २०२१ साली लग्न केलं. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर मेहुल आणि अभिज्ञा लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या काही वर्षातच मेहुलला कोरोनाची लागण झाल्याचं कळलं. 

मेहुलची भावनिक पोस्ट 

मेहुल पै ने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो म्हणतो की,’मी माझ्या आयुष्यात अनेक मुर्खांना भेटलो आहे.  पण कॅन्सर हा त्यापैकी एक सर्वात मोठा मूर्ख ठरला. सॉरी कॅन्सर…. तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस.’ असं म्हणतं मेहुलने दोन फोटो पोस्ट केलेत. या फोटोत मेहुल पैसोबत अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील दिसत आहे. 

हे दोन्ही फोटो रुग्णालयातील आहेत. या फोटोंतून मेहुलचे केमो झाल्याचं दिसत आहे. अनेक मराठी कलाकारांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. 

मेहुलच्या तू फायटर आहेस… असं म्हटलं आहे. तर मयुरी देशमुखने तुझ्यासोबत असलेल्या व्यक्तीमुळे विजय तुझाच आहे. तू रॉकस्टार असल्याच म्हटलं आहे. Source link

Leave a Reply