रोहित शर्माला कोण म्हणतंय “भगोडा”? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल


मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्त त्याने भावनिक ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाचं आता रोहितला ‘भगोडा’ म्हटल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.  

IPL चा हंगाम संपल्यानंतर अनेक सीनीयर खेळाडूंना विश्रांती देत, युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिकेसाठी संधी दिली होती. या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पाचवा सामना पावसाअभावी होऊ न शकल्याने भारत-दक्षिण आफ्रिकेने 2-2 ने मालिका बरोबरीत सुटली.  
 
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने संघावर टीका होत होती. तसेच ज्या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती, त्या खेळाडूंवरही टीका करण्यात आली. 

एका न्यूज चॅनेलच्या डिबेट शोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार 35 वर्षीय खेळाडूवर टीका करताना काही अपमानास्पद शब्द वापरताना ऐकू येतोयत. 

व्हिडिओत काय?

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा उल्लेख करताना कहा है भगोडा? असे म्हटले. तसेच त्य़ाच्या बॉडीवरून टीका केली आहे.  

रोहितला व्हेकेशनवर जाण्याची गरज नव्हती. प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मालिका गमावण्याऐवजी मुंबईच्या फलंदाजानी त्यात खेळले असते तर बरे झाले असते,अशी टीप्पनीही देखील करण्यात आली.  

“कुठे आहेस रोहित शर्मा? त्याला कॉल करा आणि खेळायला सांगा. तो क्रिकेटर आहे की काय? भगोडा ही है, खेलना नहीं चाह रहा है (तो एक भगोडा आहे ज्याला खेळायचे नाही). तो (नवज्योत सिंग) सिद्धूसारखा झाला आहे, त्याला गोलंदाजांचा सामना करायचा नाही, ”असा हा क्रिडा पत्रकार व्हिडिओमध्ये बोलतोय. 

दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरील संवादावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तर रोहित शर्माच्या टीकेवर चाहते संतापले आहेत.Source link

Leave a Reply