Richa Chadda आणि Ali Fazal ची अनोखी लग्नपत्रिका, तुम्ही पाहिलीत का?


Richa Chaddha and Ali Fazal: बॉलीवूडमध्ये गेल्या पाच वर्षात मोठमोठ्या सेलिब्रेटींची लग्न पार पाडली त्यात आता रिचा चड्ढा आणि अली फजल (Richa Chaddha and Ali Fazal) यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 2 ऑक्टोबर रोजी हे कपल लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. तत्पुर्वी त्याचं लग्न सप्टेबंरमध्ये होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. (actress richa chadda and ali fazal wedding card goes viral see the unique wedding card)

गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. परंतु ते दोघं कधी लग्न करणार यावर मात्र कोणाला काहीच माहिती नव्हतं. त्यांच्या चाहत्यांनाही अपेक्षा होती हे कपल लवकरच लग्न करेल. आता लवकरच ते दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. त्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक झाले आहेत, आणि याच उत्सुकतेपायी त्यांच्यासाठी त्यांच्या एका चाहत्यानं लग्नपत्रिका तयार केली आहे ही लग्नपत्रिका (Richa Chaddha and Ali Fazal Wedding Card) सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातले आहे. 

मध्यंतरी या दोघांच्या लग्नातील मेन्यू कार्डची जोरात चर्चा सुरू होती. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या वेडिंग कार्डची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हे वेडिंग कार्ड माचिसच्या डबीवर तयार केले असून या डबीवर त्या दोघांची छबी अगदी रेट्रो लुकमधल्या हिरो – हिरोईन प्रमाणे आहे. यात ते दोघं सायकलवर बसलेले दिसत असून हे चित्र पॉप आर्ट पद्धतीनं तयार केलं आहे. हा लुक पुर्णत: नव्वदच्या दशकातला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रिचा तिच्या लग्नातही पारंपारिक दागिने परिधान करताना दिसणार आहे, तेही राजस्थानी शैलीत. तिच्या लग्नासाठी बिकानेर येथील एका कुटुंबाकडे दागिने बनवण्याचे काम सोपवण्यात आले असून 175 वर्ष जुन्या ज्वेलर परिवार यासाठी नेमण्यात आला आहे. कॅशियर कुटुंब रिचाचे दागिने बनवत आहेत, अशी माहिती कळते. Source link

Leave a Reply