Headlines

प्रतिनिधित्व नसल्याने महिला नेत्यांची नाराजी

[ad_1]

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर ३९ दिवसांनंतर मुहूर्त मिळाला तरी एकाही महिलेला संधी न मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने महिलांची उपेक्षा केल्याची व महिला नेतृत्वाला दुय्यम वागणूक दिल्याची टीका होत आहे.

मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे अशी  टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिला अत्याचारांच्या प्रकरणाचा भाजपने आरोप केलेले संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आले. पण एकाही महिला नेत्याला मंत्रिमंडळात संधी द्यावी असे या सरकारला वाटलेले नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यावरून या सरकारचा दृष्टिकोनही स्पष्ट होतो, अशी टीका शिवसेनेचे आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली. ठाकरे सरकारमध्ये यशोमती ठाकूर, वर्षां गायकवाड, आदिती तटकरे आदी महिला मंत्री होत्या याची आठवणही कायंदे यांनी करून दिली.

एकाही महिला नेत्याला संधी दिली नाही ही आश्चर्याची बाब आहे अशी नाराजी काँग्रेस आमदार व माजी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. महिला नेत्यांना मंत्रिमंडळात संधी नाकारताना एका महिलेच्या प्रकरणात भाजपने आरोप केल्यामुळे मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांना मात्र भाजपच्या वॉशिंग पावडरमुळे स्वच्छ झाल्याने मंत्रिमंडळात घेतले असावे असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला.

भाजप दुटप्पी : यशोमती ठाकूर

महिलांचा समावेश होईल – वाघ राज्य मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात महिला मंत्र्यांचा समावेश नसला तरी पुढील विस्तार लवकरच होईल आणि त्यात महिला मंत्री असतील, असे भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्येही सुरुवातीला महिलांना मंत्रिमंडळात स्थान नव्हते. पण भाजपचे तसे नाही. भाजपमध्ये अनेक महिला आमदार असून त्या उत्तम काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाकडून लवकरच मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली जाईल, असे वाघ यांनी स्पष्ट केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *