Headlines

राऊतांच्या घरातील नोटांवर मुख्यमंत्री शिंदेचं नाव असल्यावरुन प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या हसत म्हणाले, “मी…” | kirit somaiya enforcement Directorate raid on sanjay Raut Home Name of CM Eknath Shinde on Cash recover scsg 91

[ad_1]

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या साडेअकरा लाखांपैकी १० लाख रुपयांचा संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी असल्याच्या बातम्यांवर भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी सूचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अटक केली.  राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. ईडीला राऊत यांच्या घरी सापडलेल्या रोख रक्कमेसंदर्भातही एक मोठा खुलासा समोर आल्यानंतर त्यावर सोमय्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> २४ तासांत राऊतांविरोधात तिसरी FIR, किरीट सोमय्यांनी दिली माहिती; राऊतांच्या दुबईवारीचा उल्लेख करत म्हणाले, “पुढे किती गुन्हे…”

१० लाखांच्या बंडलवर शिंदेंचं नाव
संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. समोर आलेल्या वृत्तानुसार जप्त करण्यात आलेल्या या रक्कमेपैकी १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> “राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी…”; राऊतांविरोधातील कारवाईचा उल्लेख करत सेनेचा भाजपावर हल्लाबोल

शिंदेंच्या नावासंदर्भात राऊतांनी केला खुलासा
एकूण ११ लाख ५० हजार रुपये राऊत यांच्या घरामध्ये सापडले. त्यापैकी १० लाख रुपयांचे नोटांचे बंडल असणाऱ्या कव्हरवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदार, खासदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र यासंदर्भातील खुलासा करताना राऊत यांनी हे पैसे शिवसेना नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी बाजूला काढण्यात आल्याचा दावा केल्याचंही सांगितलं जात आहे.

नक्की वाचा >> संजय राऊतांना ‘ईडी’कडून अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात…”

सोमय्या काय म्हणाले?
संजय राऊतांच्या घरात मिळालेल्या साडेअकरा लाखांपैकी १० लाख हे एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यासाठी त्यांच्याकडे जमा केल्याचं सांगितलं जात आहे, असा संदर्भ देत पत्रकाराने सोमय्यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सोमय्या यांनी हसत, “मी ऐकीव गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही,” असं म्हटलं. “कही सुनी बातो पे हम कॉमेंट नाही देते,” अशा शब्दांमध्ये सोमय्यांनी या १० लाखांसंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया नोंदवत थेट उत्तर देणं टाळलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *