रस्त्यावरून फरफटत घेऊन जाणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीची आठवण आजही रतन राजपूत सतावते, म्हणते…


Ratan Rajput: बीग बॉस या रिएलिटी शोमधून प्रेक्षकांची मनं जिकूंन घेणारी अभिनेत्री रतन राजपूत सध्या चर्चेत आहे. रतन सोशल मीडियावर आपले फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. रतन अनेकदा तिच्या व्लॉगद्वारे त्याच्या आयुष्याशी संबंधित किस्सेही शेअर करतो. नुकतीच तिने तिच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट शेअर केली आहे जी ऐकून तुमच्या पायाखाली जमीन नक्कीच सरकेल. 

ती दिल्लीत असताना तिच्यासोबत घडलेली एक घटना सांगितली आहे. नुकताच रतनने स्वतःसाठी एक नवीन फोन घेतला आहे. तेव्हा याबद्दलची पोस्ट लिहिताना तिला असाच एक फोनवरून घडलेल्या किस्सा सांगितला आहे. 

रतने सांगितले की, ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा मी दिल्लीत राहायचे. त्या दिवसांत मी मंडी हाऊसमध्ये नाटकाचा सराव करत असे. एके दिवशी मंडी हाऊसमधून परतत असताना मी माझ्या आईशी फोनवर बोलत होत तेव्हा एका मुलाने माझा फोन जबरदस्तीने हिसकावून घेण्यास सुरुवात केली. 

मी मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा केला पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. लोक तिथे उभं राहून तमाशा बघत होते. जेव्हा मी एकाकडूनही मदत मिळाली नाही तेव्हा मीच स्वतःची सोडवणूक केली. त्या मुलाचा पाठलाग करत असताना मी खूप पुढे आले तेव्हा एक मुलगा माझी मदत करायला पुढे देखील आला परंतु तो तर सरळ माझा हात धरून मला जंगलाच्या दिशेनेच ओढब लागला होता. 

तो मला असं सांगू लागला की आ तेरा फोन में तूझे देता हूं परंतु मला काहीतरी गडबड वाटली त्यावेळी मला वाटले की आता मी गेले. आता मी जगेन की नाही असा प्रश्न मला पडला. मी ओरडत होते पण तेवढ्यात दोन मुलं स्कूटरवरून जात होती. त्यापैकी एक माझ्या मदतीला आला. तेव्हा त्या घटनेपासून मी कधीबशी वाचले आणि मी घरी गेले. 

रतन राजपूतने याआधी ‘राधाच्या मुली कुछ करो’, ‘महाभारत’, ‘संतोषी माँ’, ‘रिश्तों का मेला’ आणि ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. Source link

Leave a Reply