Rashmika Mandanna च्या बोल्ड फोटोशूटवर तुमचा देखील आक्षेप? पाहा फोटो


Rashmika Mandanna’s  bold photos : अभिनेता रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) कायम आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ‘पुष्पा’ सिनेमातीची ‘श्रीवल्ली’ म्हणून देखील अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या  संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (rashmika mandanna bold photo)

आता देखील रश्मिकाने स्वतःचे तीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीने स्टायलिश लेहेंगा घातला आहे. अनेकांना रश्मिकाचा लूक आवडला आहे तर, अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. (rashmika mandanna songs)

ग्लॅमरस फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘हळू-हळू आता व्यवसायाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात…’ असं लिहिलं आहे. रश्मिकाच्या फोटोंवर 2 तासांत 15 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत. शिवाय कमेंटचा देखील वर्षाव होत आहे. 

कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. कमेंटमध्ये एका युजरने ‘तुला बॉलिवूडची हवा लागली का?’ असं लिहीलं आहे. तर दुसरीकडे अनेकांनी अभिनेत्रीच्या नव्या लूकला पसंदी दर्शवली आहे. सध्या सर्वत्र रश्मिकाच्या तीन फोटोंची चर्चा आहे. 

रश्मिका मंदान्नाचे आगामी सिनेमे

रश्मिका मंदाना लवकरच ‘पुष्पा द रुल’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ( rashmika mandanna new movie,)

‘पुष्पा द रुल’ सिनेमाचा पहिला भाग ‘पुष्मा’ सिनेमाने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. महत्त्वाचं म्हणजे सिनेमा साऊथचा असला तरी बॉलिवूडमध्ये सिनेमाने कमालीचा गल्ला जमा केला. आता चाहते ‘पुष्पा द रुल’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आलेत. (rashmika mandanna hindi dubbed movie)Source link

Leave a Reply