Headlines

राशिभविष्य : आज या राशींचा आर्थिक प्रश्न सुटेल, अधिक जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : Horoscope 12th February 2022: शनिवारी सिंह राशीच्या लोकांची अधिकाऱ्यांशी खास ओळख होईल. दुसरीकडे, तूळ राशीच्या लोकांच्या मनात काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि उत्कटता दिसून येईल. ज्योतिषी बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घ्या शनिवार तुमच्यासाठी कसा असेल. 

मेष : आज तुमच्या घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.  

वृषभ : आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. यासोबतच लाभाचे नवे मार्गही दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील.

मिथुन : आज स्वतःसाठी वेळ काढणे चांगले राहील. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. झटपट यश मिळवण्याच्या नादात अयोग्याकडे दुर्लक्ष करु नका.

कर्क : आज तुम्हाला तुमच्या मनातील बोलण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी डीलरसाठी शनिवार अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह: तुम्ही इतरांचे म्हणणे ऐका. दुसऱ्याला दिलेले पैसे मिळू शकतात. अनावश्यक खर्चात कपात करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने बदल घडू शकतात. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत काही नवीन नियोजन कराल.

कन्या : आज तुमच्याशी अनेक संवाद साधतील. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जाणकार आणि ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे. तसेच आर्थिकबाबी सुटतील. सामाजिक आघाडीवर एखाद्याला मदत केल्याबद्दल प्रत्येकजण कौतुक करेल.

तूळ: आज तुम्ही राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि ध्यास मनात दिसून येईल. खाद्यपदार्थ व्यापार्‍यांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. याशिवाय एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.
 
वृश्चिक: आज तुमची उदार भावना लोकांना खूप प्रभावित करेल. तसेच तुम्हाला नवीन दागिने ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. झटपट पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवू नका आणि काळजी घ्या. विवाहितांना मुलांचे सुख मिळेल.
 
धनु : तुमच्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचा कोणताही छंद किंवा कौशल्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही नवीन काम सुरू करण्याचा तुमचा विचार असेल. आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रीत केल्याने तुमचे मन शांत राहील. तसेच दुकानाशी संबंधित चिंता राहिल.

मकर : आजच्या दिवसाची सुरुवात नव्याने होईल. घरातून काम करणाऱ्या लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. रिअल इस्टेटशी संबंधित लोक सवलत देऊ शकतात. व्यवसायात कोणतेही बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळू शकते.

कुंभ : या शनिवारी छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणे टाळावे. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. जर तुम्ही ऑनलाइन व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना कराव्यात. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.

मीन : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. नोकरीत तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. सामाजिक आघाडीवर नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. कुटुंबातील तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *