रणबीर कपूरने ‘या’ चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार, नंतर ठरले ब्लॉकबस्टर


Ranbir Kapoor Rejected Movies: रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. रणवीर कपूर त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पत्नी आलिया भट्टसोबत दिसणार आहे. असं असलं तरी रणबीर कपूरने नाकारलेल्या चित्रपटांची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याने नाकारलेले काही चित्रपट रुपेरी पडद्यावरील हिट ठरले आहेत. जाणून घेऊयात कोणत्या चित्रपटांना रणबीर कपूरने नकार दिला होता.

 रणबीरला अशा अनेक चित्रपटांची ऑफर आली होती जी त्याने काही कारणास्तव नाकारली होती आणि नंतर तेच चित्रपट पडद्यावर हिट ठरले. चला, जाणून घ्या कोणते होते ते चित्रपट.

डेली बेली

‘डेली बेली’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अनेक बॉलिवूड स्टार्सना अप्रोच करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यापैकी एक नाव रणबीर कपूरचे होते. मात्र, त्याने काही कारणास्तव हा चित्रपट करण्यास नकार दिला. नंतर हा चित्रपट इम्रान खानला ऑफर करण्यात आला. 23 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर 91 कोटींची कमाई केली.

जिंदगी ना मिलेगी दोबारा

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीरलाही या चित्रपटाची ऑफर आली होती, परंतु त्याने या चित्रपटात काम केले नाही. नंतर ते पात्र हृतिक रोशनने साकारले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 175 कोटींची कमाई केली होती.

दिल धडकने दो

‘दिल धडकने दो’ हा एक उत्तम चित्रपट आहे. मात्र, हा चित्रपट सर्वप्रथम रणबीर कपूरला ऑफर करण्यात आला होता. पण त्याने  ऑफर नाकारली. हा चित्रपट 58 कोटींच्या बजेटमध्ये तयार केला होता, ज्याने पडद्यावर 145 कोटींची कमाई केली होती.

गल्ली बॉय

झोया अख्तरच्या गली बॉय या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट रणबीर कपूरलाही ऑफर करण्यात आला होता जो त्याने नाकारला होता. नंतर रणवीर सिंगने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.Source link

Leave a Reply