Headlines

रणबीर कपूरचा मोठा खुलासा; म्हणाला आलियासाठी ‘या’ स्टारला फसवलं!

[ad_1]

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियावर जाहीर केलं होतं की, लवकरच ती आई होणार आहे. गरोदरपणाच्या घोषणेनंतर तिच्या पहिल्या पब्लिक अपियरेंसमध्ये, रणबीर आणि आलियाने उघड केलं की, रणबीरने आलियासाठी एका स्टारची कशी फसवणूक केली. 

प्रेग्नेंसी अनाउन्स्मेन्टनंतर पहिल्यांदा एकत्र दिसले Alia-Ranbir 
रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्रच्या आगामी गाण्याच्या, देवा-देवाच्या  प्रीव्यूसाठी एकत्र दिसले होते. आलियाने गरोदरपणाची घोषणा केल्यापासून ते दोघं एकत्र दिसले नव्हते. या कार्यक्रमाच्या फोटोंमध्ये आलियाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जीही दोन्ही कलाकारांसोबत दिसले.

रणबीरने आलियासाठी या स्टारला फसवलं
गाण्याच्या प्रिव्ह्यूदरम्यान रणबीर आलियाने मीडियाशी संवाद साधला ज्यामध्ये रणबीरने एक मोठा खुलासा केला. यावेळी त्याने सांगितलं की, रणबीरने त्याचा चांगला मित्र अयानलाही आलिया आणि दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं नव्हतं.

रणबीरने सांगितलं की, जेव्हा त्याने आलियाला डेट करायला सुरुवात केली तेव्हा त्याने अयानला याबद्दल सांगितलं नाही कारण अयान ब्रह्मास्त्रमध्ये इतका मग्न होता की, त्याची प्रत्येक चर्चा चित्रपटापासून सुरू होते आणि चित्रपटातच संपते. रणबीर आणि आलिया दोघांनाही वाटत होतं की, जर त्याने अयानला या नात्याबद्दल सांगितलं तर तो ‘फ्रिक आऊट’ होईल.

त्यानंतर मीडियाने अयानला विचारलं की, जेव्हा त्याला समजलं की, त्याचे दोन्ही बेस्ट फ्रेंड स्टार एकमेकांना डेट करत आहेत, तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी होती? यावर अयानने सांगितलं की, रणबीरने त्याला हे सांगताच त्याने शांत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, त्याला त्याच्या जवळच्या मित्रांसोबत ‘बेस्ट बिहेवियर’ मध्ये रहायचं होतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *