Ranbir – Aliaच्या लग्नाला महिनाही उलटला नाही, तोच चर्चा दुसऱ्या लग्नाच्या ठिणगीची?


मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाचा महिनाही उलटला नाहीये, तोच कपूर कुटुंबातून अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही चर्चा किंवा तत्सम माहिती आहे दुसऱ्या लग्नाची. (Alia bhatt ranbir kapoor wedding )

एक लग्न तग धरत नाही, तोच हे दुसरं लग्न… नेमकं काय प्रकरण आहे? तुम्हालाही पडला ना प्रश्न ? ज्या लग्नानं कपूर कुटुंबालाही गोष्टी उमगण्यापलीकडे होत्या ते लग्न होतं अभिनेते शम्मी कपूर  आणि नीला देवी यांचं. (Bollywood news )

कपूर कुटुंब आणि त्यांची नाती चर्चेत असतानाच एकाएकी या नात्यानंही सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. शम्मी कपूर यांनी अभिनेत्री गीता बाली यांच्याशी लग्न केलं होतं. 

आजारपणामुळं गीता यांनी अर्ध्यातच त्यांची साथ सोडली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पुढे आदित्य आणि कंचन या दोन्ही मुलांसाठी नाईलाजानं शम्मी यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. नीला देवी यांना त्यांनी जोडीदार म्हणून निवडलं. 

हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत शम्मी यांचा मुलगा आदित्य यानं वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत वक्तव्य केलं. आपण आपल्या वडिलांच्या दुसऱ्य़ा लग्नाविषयी अनभिज्ञ असल्याचं आदित्य यांनी स्पष्ट केलं. हे लग्न झालं आणि तेव्हा कुठे त्यांना याची माहिती मिळाली. 

लग्न झालं तेव्हा वडिलांनी आम्हाला याची कल्पनाच दिली नव्हती. सकाळच्या वेळेत त्यांचं लग्न झालं आणि आम्हाला आमच्या नातेवाईकांच्या घरी सोडण्यात आलं, असं आदित्य यांनी सांगितलं. 

तेव्हा त्यांचं वय जेमतेम 13 वर्षे इतकं होतं. लग्नानंतर सायंकाळी त्यांनी वडिलांची भेट घेतली जेव्हा नीला देवी तुमची आई असल्याचं आदित्य यांना सांगितलं. त्या क्षणी आपण आईला मिठी मारल्याचं सांगत नीला देवी, आपली दुसरी आई एक अप्रतिम महिला असल्याचं आदित्य यांनी स्पष्ट केलं. 

नात्यांची वेगळी समीकरणं कायमच कपूर कुटुंबात पाहायला मिळाली आहेत. शम्मी कपूर आणि नीला देवी यांचं हे नातंही त्याचंच एक उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. Source link

Leave a Reply