Ranbir- Alia Wedding : ना बँड बाजा, ना वरात; शांततेत रणबीरचं वऱ्हाड येणार घरात


Ranbir- Alia Wedding :  डेस्टिनेशन वेडिंगचं आयोजन न करता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या प्रेमी युगुलानं मुंबईतच त्यांच्या लग्नसोहळ्याचा बेत आखला. ठरल्याप्रमाणं तयारी केली गेली, मेहंदीसोहळा पार पडला, हळदीसाठी पाहुणेही आले. 

सप्तपदीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यात शेटच्या क्षणी मात्र मोठे बदल करावे लागले. 

सूत्रांच्या माहितीनुसार रणबीरची वरात निघणार नसल्याचं चित्र आता दिसत आहे. अद्यापही स्थानिक पाली हिल पोलीस यंत्रणा किंवा तत्सम कोणत्याही यंत्रणेकडे अशा संदर्भातील परवानगीचं पत्रक आलेलं नाही. 

रणबीरनं फक्त त्याच्या इमारतीनजीकच सुरक्षेवर भर देण्याची मागणी पोलीस आणि संरक्षकांना दिली होती. परिणामी त्याची वरात निघणार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे. 

लग्नसोहळ्यामध्ये आपल्या चित्रपटातील गाणं वाजवू नये अशी विनंतीसुद्धा रणबीरनं केल्याचं कळत आहे. मेहंदी सोहळ्यातही त्यानं अशी विनंती केल्याचं कळत आहे. 

रणबीरला त्याच्या खासगी आयुष्याला मर्यादित लोकांशीच शेअर करायला आवडतं. परिणामी त्यानं लग्नसोहळाही अतिशय खासगी, छोटेखानीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

परंपरांची कास धरत या सर्व विधींना तो खासगीतर पूर्ण करु इच्छितो. परिणामी आलिया- रणबीरच्या मेहंदी आणि हळदी समारंभासाठीसुद्धा मर्यादित उपस्थितसंख्या पाहायला मिळाली. 

Ranbir Alia Wedding: इस खास शख्स ने रणबीर-आलिया को तोहफे में दिया सोने से मढ़ा गुलाब, देखें वीडियो

एकिकडे अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंगचा पर्याय निवडत असताना आणि विवाहसोहळ्याचं मोठ्या भव्य स्वरुपात आयोजन करत असतानाच रणबीर आणि आलियानं परिस्थिती किंवा आणखी काही कारणांमुळं घेतलेला हा छोटेखानी लग्नाचा निर्णय सर्वांचीच मनं जिंकताना दिसत आहे. Source link

Leave a Reply