Ranbir- Alia Wedding : फक्त 4 फेऱ्यांतच उरकलं आलिया- रणबीरचं लग्न; असं का? जाणून घ्याणून घ्या


Ranbir- Alia Wedding :  जवळपास 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंब आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत या जोडीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. घरच्या घरी या बहुप्रतिक्षित लग्नाचा घाट घातला गेला होता. 

आलियाच्या लग्नाचा उपस्थित असणाऱ्या तिच्या कुटुंबीयांमध्ये भाऊ राहूल भट्टचाही समावेश होता. राहुलनंच दिलेल्या माहितीनुसार आलियानं लग्नाच 7 फेरे मारलेच नाहीत. अवघ्या 4 फेऱ्यांमध्येच तिचं आणि रणबीरचं लग्न उरकलं. (Rahul Bhatt)

या लग्नाविषयी सांगताना राहुल म्हणाला, ‘रणबीर आणि आलियानं 7 नव्हे, 4 फेरे मारले. त्यांच्या लग्नासाठी खास ब्राह्मण आले होते. ते कैक वर्षांपासून कपूर कुटुंबाचे धार्मिक विधी करत आहेत. त्यांनी यावेळी फेऱ्यांचं महत्त्वं समजावून सांगितलं. 

एक असतो धर्मासाठी, एक अपत्यासाठी… हे सर्व पाहणं फारच कुतूहलाचं होतं. मी एका अशा कुटुंबात आहे जिथं अनेक धर्माचे लोक आहेत. तर तात्पर्य असं की आलिया आणि रणबीरनं 7 नव्हे चारच फेरे मारले….’

आलिया आणि रणबीरनं अतिशय छोटेखानी स्वरुपात लग्नसोहळा उरकला. ज्यानंतर ही जोडी काही क्षणांसाठी माध्यमांसमोर येत चाहत्यांच्याही शुभेच्छांचा स्वीकार त्यांनी केला. इथं त्यांच्या चेहऱ्यावरून झळकणारा आनंद सर्वांची मनं जिंकणारा होता. 

राहिला मुद्दा या लग्नाच्या स्वागतसोहळ्याचा तर, येत्या दिवसांमध्ये त्याबद्दलची माहितीही समोर येईलच. तोपर्यंत… नांदा सौख्य भरे! Source link

Leave a Reply