Headlines

रणबीर-आलियाच्या लग्नानंतर 18 वर्षांपुर्वीचा रोमँटिक फोटो समोर

[ad_1]

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाला 10 दिवस उलटले आहेत. मात्र आतापर्यंत दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हे कपल इतकं सुंदर दिसत आहे की, चाहत्यांना याच्यावरुन नजर हटवणं कठिण होत आहे. त्याचबरोबर, लग्नाच्या सुंदर फोटोंमध्ये रणबीर आणि आलियाचा एक 18 वर्ष जुना फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये दोघं एकत्र बसलेले दिसत आहेत.

हा फोटो तेव्हाचा आहे. ज्यावेळी रणबीर-आलिया एकमेकांना डेट करत नव्हते. फोटोमध्ये रणबीर चेहऱ्यावर हात ठेवून बसला आहे आणि आलिया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आहे. तेव्हा दोघंही एकमेकांना डेट करत नसतील, पण फोटोत या दोघांमध्ये एक सुंदर बाँडिंग पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर हा फोटो 2004 मधला आहे. जेव्हा रणबीर कपूर ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांना असिस्ट करत होता आणि आलिया भट्ट या चित्रपटासाठी ऑडिशन देत होती. हे फोटो आलियाच्या लिव्हिंग रूममधलंही असल्याचं बोललं जातंय. 

आलिया आणि रणबीरचं १४ एप्रिल रोजी लग्न झालं होतं. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे लोकं उपस्थित होते. लग्नानंतर दोघंही हनिमूनला कुठे जाणार हे जाणून घेण्यासाठी लोकं अस्वस्थ होते. मात्र रणबीर-आलिया हनीमूनला गेलेले नसून आपापल्या कामावर परतले आहेत. आलियाने तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं असून रणबीरने ‘एनिमल’चं शूट सुरु केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *