रक्षाबंधनाला बेबोसारखं सुंदर दिसायचंय ; मग तिचा हा ड्रेस नक्की ट्राय करा


Kareena Kapoor Khan – श्रावण आपल्यासोबत घेऊन येतो अनेक सणांची रेलचेल. श्रावण सुरु झाला की एकामागोमाग सणांची सुरुवात होते ती दिवाळीपर्यंत. सण म्हटला की तरुणी आणि महिलांसाठी आलं नटणं सवरणं. गुरुवारी रक्षाबंधन, त्यानंतर जन्माष्टमी आणि गणेशोत्सव येणार आहे. या उत्सावात काय घालावे असा प्रश्न अनेक तरुणींना पडला असणार आहे. 

करीना कपूर (Kareena Kapoor) तिच्या एथनिक लुकसोबतच ट्रेंडी चिक आउटफिट्ससाठी देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला बेबीसारखा लूक हवा असेल तर सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट, लक्ष्मी लेहरने (Lakshmi Lehr) इंस्टाग्रामवर बेबोचा एक सुंदर ड्रेसचा फोटो शेअर केला आहे. (kareena kapoor khan strikes a perfect desi glam look in a turquoise chanderi kurta in marathi)

करीनाच्या अविश्वसनीय फॅशन सेन्सने कायम सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. या फोटोमध्ये करीना एका निळापरीसारखी दिसत आहे. 

जर तुम्ही तुमच्या सणासुदीच्या वॉर्डरोबसाठी आउट-ऑफ-द-बॉक्स पॅलेट शोधत असाल तर हा बेबोचा ड्रेस तुम्हाला नक्की आवडेल. 

नीलमणी रंगाचा कुर्ता आणि त्याच रंगाचा शँटून पलाझो पँटमध्ये करीना खूप सुंदर दिसते आहे. तुम्ही पाहू शकता नेकलाइनवर भरतकामा करण्यात आलं आहे. सोबत निळा रंगाची नक्षीकाम केलेली चंदेरी ओढणी तिने घेतली आहे. करीनाचा हा लूक तरुणींना भुरळ घालत आहे. बेबोचा ड्रेस 26 हजारांपर्यंत आहे. Source link

Leave a Reply