Raju Srivastav : तारक मेहताने ‘या’ नावाने सेव्ह केला होता राजू श्रीवास्तवचा नंबर, सांगितलं त्यामागचं कारण


Raju Srivastava Death : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठिक नव्हती. अखेर  जीवन- मृत्यूची झुंज देताना त्यांचे काल (21 सप्टेंबर 2022) निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने भारतात शोककळा पसरली. राजू श्रीवास्तव 1982 मध्ये  मुंबईला आले आणि इथून सुरु झाला त्यांचा कॉमेडीचा प्रवास. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी पोटापाण्यासाठी ऑटो रिक्षाही चालवली. त्यांनतर त्यांनी चित्रपटांत लहान-सहान रोल देखील केले.

कॉमेडीच्या या किंगला ‘गजोधर भैय्या’ आणि ‘राजू भैय्या’ या नावाने देखील लोक ओळखतात. त्यांच्या कॉमेडी अभिनयामुळे त्यांनी लोकांच्या मनावर कित्येक वर्ष राज्य केले. ‘कपील शरमा’ (Kapil Sharma), ‘भारती सिंग’ (Bharti Singh), ‘अर्चना पूरण सिंग’ (Archana Puran Singh) अशा बऱ्याच बड्या व्यक्तींनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

हल्लीच ‘तारक मेहताचा उल्टा चष्मा’ या मालिकेतील तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा (Shailesh lodha) यांनी देखील पोस्ट शेअर करत दुख व्यक्त केले… (Raju Srivastav Why did Tarak Mehta save Raju Srivastava number राजू आओ आओ)

आणखी वाचा… Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्यातील काही खास किस्से आज मात्र तुम्हाला रडवतील…​

शैलेश लोढा दुखद पोस्ट
‘तारक मेहताचा उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील ‘तारक मेहता’ हे पात्र साकारणारे शैलेश लोढा यांनी हल्लीच मालिकेचा निरोप घेतला होता.राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबाबत कळताच शैलेश लोढा यांनी एक पोस्ट शेअ र करत सांगितले की, त्यांची राजू श्रीवास्तव यांच्यासोबत खास मैत्री होती. राजू श्रीवास्तव यांच्यासोबत घालवलेले काही आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये हे देखील सांगितले की, राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने विनोदी क्षेत्राला मोठं नुकसान झालं आहे. याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. असं ही त्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले.

‘राजू आओ आओ’ हे नाव सेव का केले होते?
‘स्टार प्लस’च्या ‘कॉमेडी चा महा मुकाबला’ या मालिकेत शैलेश लोढा आणि राजू श्रीवास्तव या दोघांनी सहभाग घेतला होता. त्या मालिकेत राजू श्रीवास्तव यांनी एक भूमिका साकारली होती. त्या भूमिकेत ते नेहमी ‘चलो’ म्हणायचे आणि त्या दिवसापासूनच शैलेश लोढा यांनी राजू श्रीवास्तव त्यांचे नाव मोबाईलमध्ये ‘राजू आओ आओ’ या नावाने सेव केले.

आणखी वाचा… अचानक बेत बदललाय, Railway Ticket रद्द करताय? थांबा… वाचा फायद्याची बातमीSource link

Leave a Reply