Ragini MMS 2 ते Once Upon A Time In Mumbai: Bold सीन देऊनही या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप


मुंबई : एकता कपूरच्या सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘कसम से’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री प्राची देसाईला या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. फरहान अख्तरनं तिला त्याचा ‘रॉक ऑन’ चित्रपट ऑफर केला आणि प्राची नाकारू शकली नाही. टीव्ही जगताला अलविदा करत तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण इथं तिचं नशीब चमकलं नाही. तिनं काही चित्रपटातही काम केलं पण दिग्दर्शकाला हवं तसं ती करू शकली नाही. प्राची व्यतिरिक्त अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये बोल्ड, सेक्स आणि किसिंग सीन दिले, पण त्यांचा यश मिळालं नाही. बहुतेक टीव्ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरल्या. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींविषयी… (prachi desai to mrunal thakur ragini mms 2 Once Upon A Time In Mumbai actress gave Sexy Bold and Kissing Scene but got flop bollywood )

प्राची देसाई बोल्ड, इंटिमेट आणि किसिंग सीनमध्ये कम्फर्टेबल नव्हती. मात्र, तिनं इमरान हाश्मीसोबत ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात काही बोल्ड सीन्स दिले होते. पण हे सगळं असूनही ती हळूहळू चित्रपटांमधून गायब झाली.

कुमकुम भाग्य सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाऱ्या मृणाल ठाकूरनं सुपर 30, बाटला हाऊस, धमाका, तुफान, जर्सी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि भरपूर किसिंग आणि इंटिमेट सीन्स दिले, परंतु अद्याप एकही हिट चित्रपट देण्यात तिला यश आलेले नाही.

आणखी वाचा : रणबीर – आलियानंतर ‘हे’ सेलिब्रिटी कपल अडकणार लग्न बंधनात?

राधिका मदाननं ‘मेरी आशिकी तुमसे’ ही या टीव्ही मालिकेत काम केलं होतं. या मालिकेला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. ‘पटाखा’, ‘मर्द को दर्द नहीं होता’, ‘आंग्रेजी मीडियम’ या चित्रपटांमध्ये तिनं काम केले. तिनं चित्रपटांमध्ये Kissing Scene दिले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिला हिट चित्रपटही देता आले नाहीत.

‘कितनी मोहब्बत है’ या टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांना प्रभावित करणारी कृतिका कामरा चित्रपटांकडे वळली. ‘बेस्ट गर्लफ्रेंड’, ‘व्हाइट शर्ट’, ‘मित्रो’ यांसारख्या चित्रपटात काम केलं. त्याचबरोबर ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये तिनं किसिंग आणि इंटिमेट सीन्स दिले, पण ती इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवू शकली नाही.

आणखी वाचा : पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर …, Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल… 

सारा खानला जेव्हा चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या तेव्हा तिनं सर्व मर्यादा ओलांडल्या. तिनं इतके बोल्ड सीन्स दिले की सोशल मीडियावर तिची खूप खिल्ली उडवली गेली. तिनं ‘एम3’, ‘हमारी अधुरी कहानी’ यांसारख्या चित्रपटात काम केलं, पण छाप पाडू शकली नाही. ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘देवों के देव महादेव’, ‘नागिन’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलेल्या मौनी रॉयला चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नाही. ‘गोल्ड’, ‘रोमियो अकबर बाल्टर’, ‘मेड इन चायना’, ‘वेले’ या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आणि स्वत:ला एक्स्पोजही केलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र, त्याचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 

Bas Bai Bas : ‘मी हार्ट ब्रोकन झाले…’, सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

एकता कपूरची आवडती अभिनेत्री अनिता हसनंदानीला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण ती इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवू शकली नाही. त्यानंतर ती छोट्या पडद्यावर परतली. तिनं ‘कुछ तो है’, ‘ये दिल, कृष्णा कॉटेज’, ‘सिलसिला’, ‘दस कहानी’, ‘रागिनी एमएमएस 2’ जोसी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.Source link

Leave a Reply