त्वरित पैशांची गरज आहे? आधार कार्डद्वारे मिळेल कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस


नवी दिल्ली : आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसा महत्त्वाचा झाला आहे. कोणतीही वस्तू खरेदी करायची असल्यास पैसे मोजावे लागतात. मात्र, अनेकदा केवळ नोकरीतून मिळणाऱ्या पगारात खर्च भागत नाही. अशा स्थितीमध्ये अनेकजण कर्जाने पैसे घेतात. बँका, सावकार अथवा सोने गहाण ठेवून प्रामुख्याने कर्ज घेतले जाते. अलीकडे बँकांनी पर्सनल लोन घेण्याची पद्धत खूपच सोपी केली आहे. त्यामुळे काही ठराविक कागदपत्रं दिल्यानंतर तुम्हाला सहज पर्सनल लोन मिळते. याशिवाय तुम्ही घरबसल्या देखील कर्जासाठी अर्ज करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही आधार कार्ड वापरून देखील पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. अनेक बँका केवायसीनंतर कर्ज मंजूर करतात. यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे देखील गरजेचे आहे. याविषयीची संपूर्ण प्रोसेस जाणून घेवूया.

आधार कार्डद्वारे करू शकता कर्जासाठी अर्ज

अनेक बँका अशा देखील आहेत, ज्या केवळ आधार कार्डद्वारे पर्सनल लोन मंजूर करतात. यामध्ये SBI, HDFC, Kotak Mahindra Bank सारख्या बँकांचा समावेश आहे. तुम्ही सहज आधार कार्ड वापरून Personal Loan घेऊ शकता. यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • यासाठी ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे, त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही बँकेच्या अ‍ॅपचा देखील वापर करू शकता. आता तुमच्या मोबाइल नंबर आणि ओटीपीद्वारे लॉग इन करा.
  • आता तुम्हाला पर्सनल लोन हा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही हे तपासू शकता. त्यानंतर रक्कम तपासून पुढे जा.
  • आता तुम्हाला तुमची खासगी माहिती जसे की नाव, जन्मतारीख, घराचा पत्ता, ऑफिसचा पत्ता इत्यादी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर काही कागदपत्रं अपलोड करावी लागतील. अशाप्रकारे केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • आता तुम्हाला आधार नंबर टाका लागेल. त्यानंतर तुमचे कर्ज मंजूर झाल्यावर तुमच्या बँक खात्यात ती रक्कम जमा होईल.

मात्र, लक्षात ठेवा की कर्जासाठी आधार कार्डसोबतच इतर काही कागदपत्रं देखील लागू शकतात. प्रत्येक बँकेची प्रक्रिया वेगळी असते. क्रेडिट स्कोरवर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही जवळील बँक शाखेत पर्सनल लोनविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता.

वाचा: फ्री नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओसह येणारे सर्वात स्वस्त प्लान्स, डेटा-अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा; किंमत फक्त…

वाचा: Realme च्या ‘या’ पॉवरफुल फोन्सचा आज पहिला सेल, २१GB पर्यंत रॅम-४८MP कॅमेरा ; किंमत १३,५०० रुपयांपेक्षा कमी

वाचा: Airtel चे धमाकेदार प्लान्स! २०९ रुपयात मिळेल डेली डेटा-कॉलिंग, Amazon Prime फ्री

वाचा: फोनच्या डिस्प्लेवर नेटवर्क सिम्बॉल ‘मिसिंग’ असेल तर, ‘असे’ करा मिनिटांत फिक्स, पाहा टिप्स

Source link

Leave a Reply