पुतण्याच्या लग्नात एकट्या पडल्या नीता अंबानी? पाहा असं काय झालं…


मुंबई : नुकताच अंबानी कुटंबात एक अतिशय दिमाखदार असा सोहळा पार पडला. हा सोहळा होता, अनिल अंबानी (Anil Ambani) आणि टीना अंबानी (Tina Ambani) यांच्या मोठ्या लेकाच्या लग्नाचा. जय अनमोल अंबानी आणि कृष्णा शाह यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थिती साता जन्मांची साथ देण्याची वचनं दिली. 

डोळे दिपवणाऱ्या अशाच या सोहळ्यामध्ये विविध बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आणि अनेक व्यावसायिकांची हजेरा पाहायला मिळाली. 

यामध्ये लक्षणीय उपस्थिती होती, ती म्हणजे टीना अंबानी यांची थोरली जाऊ आणि अनमोलची मोठी आई, अर्थात नीचा अंबानी यांची. 

नीता अंबानी या एक आधार म्हणून या लग्नसोहळ्यामध्ये दिसल्या. यावेळी त्या सप्तपदी सुरु असताना व्यासपीठावर टीना यांच्या शेजारी बसलेल्या दिसल्या. 

सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातले बरेच फोटो व्हायरल झाले. पाहता पाहता या फोटोंवर अनेक कमेंटही येऊ लागल्या.

या कमेंट काहीशा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुरातच होत्या. नीता अंबानी लग्नसोहळ्यामध्ये एकट्याच दिसल्या आणि पाहणाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. 

टीना यांच्या शेजारी मास्क लावून बसलेल्या नीता अंबानी यांना पाहून त्या एकट्या तर पडल्या नाहीत ना असाच प्रश्न काही सोशल मीडिया युजर्सनी विचारला. 

मुळात नीता अंबानींव्यतिरिक्त मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील इतर कोणताही सदस्य यावेळी दिसला नाही, किंवा त्यांपैकी कोणाचा फोटो अद्यापही सोशल मीडियावर आलेला नाही. 

नात्यांची समीकरणं काहीही असो, पण नीता अंबानी या आपलं कर्तव्य बजावत पुतण्याच्या लग्नासाठी आल्या ही बाब मात्र अनेकांची मनं जिंकून गेली. Source link

Leave a Reply