Pushpa होणं सोपं नसतंय… पाहा अल्लू अर्जुनला काय काय करावं लागलेलं


मुंबई : ‘नाम सुनके फ्लॉवर समझे क्या…’ हा डायलॉग सर्वांच्याच तोंडी सध्या पाहायला मिळत आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याची मुख्य भूमिका असणारा चित्रपट  ‘पुष्पा’ (Pushpa). 

जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करणाऱ्या या चित्रपटाने कमाईचा इतका मोठा आकडा गाठला, की भल्याभल्यांना घाम फुटला. 

फक्त दाक्षिणात्य भागात नव्हे, तर विविधभाषी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. 

ज्या भूमिकेनं अल्लू अर्जुनला इतकं लोकप्रिय केलं, त्या चित्रपटाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? 

ही एक भूमिका साकारण्यासाठी अल्लू अर्जुननं मोठ्या समर्पकपणे अभिनयच केला नाही, तर त्याने या पात्राला आणखी प्रभावी करण्यासाठी त्याच्या रुपावरही तितकीच मेहनत घेतली. 

खरंतर ही मेहनत होती, त्याच्यासाठी काम करणाऱ्या मेकअप आर्टीस्ट अर्थात रंगभूषाकारांची आणि हेअरस्टायलिस्ट अर्थात केशभूषाकारांची. 

चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी दिसणारा अल्लू अर्जुन आणि त्यानंतर मेकअप होताच बदललेला अल्लू अर्जुन हे पाहताना सर्वजण प्रत्येक वेळी थक्क झाले. 

मुख्य म्हणजे, चित्रपटासाठी इतका मेकअप केल्यानंतरही अगदी सहजपणे अभिनय करणं अल्लू अर्जुनने कसं शक्य केलं हे पाहणंही डोळ्यांसाठी परवणीच ठरलं होतं.

कर्नाटकातील जंगलांमध्ये होणाऱ्या रक्तचंदनाच्या तस्करीसंदर्भातील विषय हाताळत हा चित्रपट अतिशय दमदार कमाई करुन गेला. 

चित्रपटगृहांसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. Source link

Leave a Reply