प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण


मुंबई, दि.26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विधानसभा सदस्य झीशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरण करण्यासाठी कार्य केल्याबद्दल स्वयंरोजगारीता उत्कृष्ट कर्मचारी या संवर्गातून राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल निकिता वसंत राऊत यांचा पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नेहा नलीन पावसकर यांना दिव्यांग व्यक्तीचे सबलीकरण करण्यासाठी कार्य केल्याबद्दल आदर्श व्यक्ती या संवर्गातून राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कल्याण निधी अंतर्गत  कमांडर संदीप कुमार यांची पाल्या दिव्या, नायक महेश गणपत मोहिते यांची पाल्या दिव्या, नायक महेश नंदकुमार अर्जुन पवार यांची पाल्या मानसी, हवालदार सुनिल एकनाथ इंदुलकर यांची पाल्या सिद्धी, हवालदार देविदास राजाराम पवार यांची पाल्या क्षितीजा यांना पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते 10 हजार रुपयांचे धनादेश आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले.

जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यामार्फत जय सचिन खंडेलवाल यांना (तलवारबाजी) गुणवंत पुरस्कार पुरुष खेळाडू, ऋचा दरेकर (तलवारबाजी) गुणवंत महिला खेळाडू, मानसी गिरीशचन्द्र जोशी यांना (पॅरा बॅडमिंटन) गुणवंत दिव्यांग खेळाडू, केदार रामचंद्र ढवळे (तलवारबाजी) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, प्रीती रमेश एखंडे (एक्रोबँटिक्स जिम्नॅस्टिक) गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार या सैनिकांच्या पाल्यांना श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व धनादेश देण्यात आले.

पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच उपस्थितांची भेट घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहासिनी गावडे यांनी केले.

Source link

Leave a Reply