Priyanka Chopra ची लेक जगतेय राजकन्येचं आयुष्य, कसं ते एकदा पाहाच…


Priyanka Chopra : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण या सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात येणार. काही घडामोडी असो किंवा आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला जातो. बाॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीदेखील आपल्या चाहत्यांचा संपर्कात राहण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करतात. 

बॉलिवूड  (Bollywood) आणि हॉलिवूड (Hollywood) गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ही देखील सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. प्रियंकाने लेक मालती मेरी चोप्रा निक (Malti Marie Chopra jonas) चेहरा अजून दाखवला नाही. पण त्याच्यासोबतचे अनेक सुंदर क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ ती तिच्या  अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरुन शेअर करत असते. (Priyanka Chopra shares PIC of Malti Marie trending on Social Media nm)

लेक जगतेय राजकन्येचं आयुष्य

असाच एक मालती मेरीच्या आयुष्यातील पहिल्या सहलीचा फोटो प्रियंकाने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. प्रियंका मालती मेरी चोप्रा जोनाससोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. प्रियंका आणि मालतीची ही पहिलीच सहल होती. या फोटोंमध्ये प्रियंका मालतीच्या मांडीवर खिडकीजवळ बसलेली दिसत आहे. एका फोटोमध्ये दोघेही खिडकीतून न्यूयॉर्कच्या (New York) मोठ्या इमारती आणि आकाशाकडे पाहताना दिसत आहेत.

तर दुसऱ्या फोटोत प्रियंका कॅमेऱ्याकडे पोज देत आहे तर तिची मुलगी मालती न्यूयॉर्कच्या इमारती आणि रस्त्यांकडे पाहत आहे. या फोटोंमध्येही प्रियंकाने मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने म्हटलं आहे की, हा तिच्या मुलीचा पहिला प्रवास आहे. माझ्या डोळ्यांच्या तारेचा पहिला प्रवास.

फोटो शेअर केल्यानंतर लगेचच तिच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला. दिया मिर्झा (Dia Mirza), सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि डिझायनर अनिता श्रॉफ अदजानिया (Designer Anita Shroff Adjania) यांनी रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होतो आहे. 

संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण गाजतंय (Priyanka Chopra UN Speech)

प्रियंका चोप्रा पती निक जोनासचा  वाढदिवस (nick jonas birthday) साजरा करून दोन दिवसांपूर्वी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. प्रियंकाने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केले. मुलगी मालतीलाही ती आपल्यासोबत या सहलीला घेऊन आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी मलाला युसुफझाईसह (Malala Yousafzai) अनेक नामवंत महिलांची भेट घेतली. प्रियंकाने केलेल्या भाषणाची चर्चा सगळीकडे होतं आहे. 

संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भाषणादरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने जगातील अनेक समस्या मांडल्या. प्रियांका चोप्रा ही यूएनची गुडविल अॅम्बेसेडर आहे, जिने समानता, गरिबी, भूक अशा अनेक मुद्द्यांवर जगाचं लक्ष वेधलं होतं. प्रियांकाने मुलींच्या शिक्षणाची गरज, जगातील वाढता रोष आणि प्रत्येकजण कोविड-19 साथीच्या आजाराच्या प्रभावातून सावरण्यासाठी कसे कठोर परिश्रम करत आहे यावर भर दिला.Source link

Leave a Reply