भ्रष्टाचार रोखण्यात रायगडचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठरतोय कुचकामीशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यात रायगड जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असला तरी तो कुचकामी ठरत आहे, दाखल तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, ठाणे अथवा नवी मुंबईच्या पथकांची मदत घेण्याचा तक्रारदारांचा कल वाढतो आहे. तहसिलदार मिनल दळवी यांचे लाचखोरीचे प्रकरण याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या दोन वर्षात एकाही वर्ग एकच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे धारीष्ट रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखवलेले नाही. त्यामुळे रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रातून तस्करी केलेल्या सर्वाधिक मुली देहव्यापारात ; ‘एनसीआरबी’ची आकडेवारी

अलिबागच्या तहसिलदार मिनल दळवी यांना २ लाख रुपचांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली. घरजडती दरम्यान त्यांच्याकडे १ कोटीहून रोकड आणि ६० तोळे सोनंही लाचलुचपत विभागाने हस्तगत केले. पण ही कारवाई रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली नाही. तर ही कारवाई नवी मुंबईतून आलेल्या एसीबीच्या पथकाने केली आहे. जून महिन्यात रायगडचे मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. एडज्यूडीकेशनसाठी त्यांनी ४५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३० हजार रुपयांची लाच स्विकारतांना साटम यांना पकडण्यात आले होते. ही कारवाई देखील एसीबीच्या नवी मुंबईने केली होती.

हेही वाचा- आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! पण मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीसमोर नेमकं घडलं तरी काय? Video आला समोर

गेल्या वर्षी मुरुडचे तत्कालिन तहसिलदार गमन गावित यांना लाचखोरीच्या प्रकरणात जेरबंद करण्यात आले होते. सातबारा उताऱ्यावरील निंयत्रित सत्ता प्रकारचा शेरा काढण्यासाठी त्यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. दोन शिपाई आणि तहसिलदार अशा तिघांवर लाचखोरीच्या प्रकरणात कारवाईला सामोरे जावे लागले होते. ही कारवाई देखील नवीमुंबईच्या पथकाने केली होती. यावरून रायगडचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर रायगड एसीबीची मेहरनजर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारभाराची चौकशी करा अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा, ट्वीटद्वारे केलं जाहीर

जिल्हा रुग्णालयातील १४ डॉक्टरांच्या संपतीची चौकशी करा अशी लेखी मागणी मी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. पण तीन वर्षात त्यांनी काहीच केले नाही. तक्रार मागे घ्या यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील लाचलुचपत विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी व्यक्त केले. या विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या तीन वर्षांनी बदल्या व्हायला हव्यात. ज्या पोलीस कर्मचाऱ्याची नातेवाईक हे सरकारी कर्मचारी असतील, त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती होऊ नये, आणि ज्या विभागात ट्रॅप झाले नाहीत. त्या विभांगातील अधिकाऱ्यांचे लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांशी काय संबध आहेत हे पण तपासले जायला हवे, असे मत रायगडमधील जनजागृती ग्राहक मंचाचे अध्यक्ष मंगेश माळी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- “दीपाली सय्यद यांचं ‘ना घर का ना घाट का’ असं झालंय” रुपाली ठोंबरे पाटलांची खोचक टीका

रायगड जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात ११ भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. ठाणे परिक्षेत्रात ठाणे पालघरच्या जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात कारवाईचे प्रमाण कमी आहे. जी कारवाई झाली आहे. त्यात नवी मुंबई आणि ठाणे विभागातील पथकांचा हातभार मोठा आहे.

Source link

Leave a Reply