Headlines

प्रेमानंच घेतला अभिनेत्रीचा जीव; अशी वेळ कोणावरही येऊ नये… 

[ad_1]

मुंबई : 60-70 च्या दशकातील अभिनेत्री प्रिया राजवंश जरी आज आपल्यात नसल्या तरी. त्यांच्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची चर्चा आजही होत आहे. प्रिया यांचं संपूर्ण आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं होतं. 

अभिनेत्रीनं 1964 मध्ये ‘हकीकत’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि हा चित्रपट त्यांच्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक होता. देव आनंदचे मोठे भाऊ चेतन आनंद यांनी प्रिया यांना सिनेसृष्टीत आणलं होतं. जे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रिया राजवंश यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये चेतनसोबत सर्वाधिक हिट चित्रपट दिले होते. या चित्रपटांमध्ये ‘हीर रांझा’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘हंसते ज़ख्म’, ‘साहेब बहादुर’, ‘कुदरत’ आणि ‘हाथों की लकीरें’ या चित्रपटांचा समावेश आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतन आनंदची प्रिया वंशासोबतची जवळीक वाढू लागली आणि प्रिया यांच्या मनातही चेतन यांनी घर केलं होतं.  

चेतन यांचं लग्न  आधीच झालं होतं. पण ते पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत होते. असं म्हटलं जातं की, चेतन आणि प्रियामध्ये सगळं काही सुरळीत चालू होतं. 

पण अभिनेत्रीच्या आयुष्यात ट्विस्ट 1997 मध्ये चेतन यांच्या मृत्यूनंतर आला. चेतन गेल्यानंतर जेव्हा मृत्यूपत्र वाचण्यात आलं तेव्हा त्यात असं दिसून आलं की, चेतन यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी प्रिया राजवंश यांना दिली होती.
चेतन आनंद यांच्या दोन्ही मुलांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती त्यांना खटकली.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतन यांची दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. 

वडिलांचं प्रिया यांच्याशी असणारं नातं पाहता त्यांना प्रियाचा खूप राग यायचा. हीच गोष्ट प्रिया यांना महागातही पडली आणि त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. असं म्हटलं जातं की, प्रियाच्या हत्येसाठी चेतन यांच्या दोन्ही मुलांवर आरोप करण्यात आला होता. 

या सगळ्याचा राग डोक्यात ठेवून चेतनच्या दोन्ही मुलांनी प्रियाला मारण्याचा कट रचला. प्रियाला मारण्यासाठी चेतन आनंदच्या दोन्ही मुलांनी नोकरांना पैशाचं आमिष दाखवलं. आणि नोकरांनीही हे करण्यास होकार दिला.  आणि त्यांचा गळा दाबून खून करण्याचा कट रचला. 26 मार्च 2000 च्या रात्री माला चौधरी यांनी चहामध्ये नशेचं औषध मिसळलं आणि प्रिया यांना दिलं.

यानंतर प्रिया बेशुद्ध झाल्या. यानंतर अशोकन स्वामी यांनी त्यांचा गळा दाबला. मात्र, माला चौधरी यांना वाटलं की प्रिया जिवंत आहेत. त्यानंतर त्या बाथरूममध्ये गेल्या आणि तिच्या डोक्यावर कपडे धुण्याच्या पट्ट्याने दोन ते तीन वेळा हल्ला केला. त्यानंतर प्रियाचा मृत्यू झासा. 27 मार्च रोजी सकाळी शेजाऱ्यांना कळलं की प्रिया यांचा मृत्यू झाला आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की प्रिया यांना गळा दाबून मारण्यात आलं.  चेतन आनंद यांच्या मुलांनी त्यांच्या नोकरांवर आरोप केले. मग जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा ते पुर्णपणे तुटले. पोलिसांनी चेतन यांच्या दोन्ही मुलांना अटक केलं. मात्र काही दिवसातच त्यांना जामिन मिळाला. प्रियाची केस आजही कोर्टात सुरू आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *