Headlines

Police attempt pressurize Nandurbar victims families torture death case ysh 95

[ad_1]

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील महिलेवरील अत्याचार आणि संशयास्पद मृत्यू प्रकरणात खाकी गणवेशात नसणाऱ्या दोन व्यक्तींनी गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे सुरू असून याबद्दल समाधानी असल्याचे आणि तपासाबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये, अशा पत्रावर पीडितेच्या कुटुंबीयांची स्वाक्षरी मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा <<< प्रथा-परंपरेच्या दुष्टचक्रात मुलींचा अजूनही बळी; कोपरगावमध्ये आईच्या मर्जीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपींना अटक

हेही वाचा <<< धक्कादायक : स्वत:चाच गळा चिरून तरुणाची आत्महत्या; धायरी भागातील घटना

धडगाव पोलीस निरीक्षकांच्या नावे असलेल्या पत्रावर पीडितेच्या वडिलांची स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न  सरपंच आणि ग्रामस्थांनी रोखला. पीडितेच्या नातेवाईकांवर पोलिसांच्या नावे दबाव आणण्याचा प्रकार चिंताजनक असून नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांनी याची चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात हलगर्जीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ अवताडे यांची उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठविले गेले आहे. कुटुंबीयांच्या मागणीनुसार मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दीड महिन्यापेक्षा अधिक दिवसांनंतर पीडितेवर धडगावच्या खडक्या गावी अंत्यविधीचे संस्कार करण्यात येणार होते. त्याच सुमारास हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात पोलिसांनी आधी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेवर अत्याचार होऊन तिची हत्या झाल्याच्या वडिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. यात पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असताना यंत्रणा अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून कुटुंबीयांवर दबाव टाकत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे. शनिवारी दोन व्यक्ती गावात आल्या. पीडितेच्या वडिलांची त्यांनी दोन अर्जावर स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक पत्र धडगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या नावे होते तर दुसरे जाहीर आवाहनाचे होते. गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, तिच्या प्रकरणात सार्वत्रिक चर्चा थांबविण्यात यावी. सार्वजनिक चर्चा झाल्यास तपासावर परिणाम होईल असे कुटुंबीयांकडून लेखी घेण्याचा प्रयत्न होता. तसेच पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये, अशी मागणी कुटुंबीयांकडून करवून घेण्याचा संशयितांचा प्रयत्न होता. परंतु, सरपंच आणि ग्रामस्थांनी त्यास आक्षेप घेतला. नंतर ती पत्रे उपनिरीक्षक घेऊन गेल्याचे पीडितेच्या वडिलांनी आपणास सांगितल्याची माहिती सरपंच सुरसिंग वळवी यांनी दिली.

हेही वाचा <<< पुणे : विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा

अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

या संदर्भात  नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी अशा प्रकारे कोणाला पोलिसांनी पाठविण्याचा प्रश्नच नाही आणि कोणी पोलीस गेलेले नसावे, अशी ग्वाही दिली. पीडितेचे वडील आणि सरपंचांना वकिलांनी सांगितल्याशिवाय कुठल्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करू नये, असे सांगण्यात आले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *