Headlines

फोन चोरी झाल्यास सर्वात आधी करा हे तीन काम, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

[ad_1]

नवी दिल्ली: Phone Lost: फोन चोरी जाणे किंवा हरवणे ही आता नवीन गोष्ट नाही. चोर तुमच्या नकळत कधी फोन तुमच्या बॅगमधून गायब करतील हे सांगता येत नाही. घाई- गर्दीच्या ठिकाणी सहसा या चोरीच्या घटना घडतात. फोन हरविला तर युजर्सना सर्वाधिक भीती वाटते ती म्हणजे त्यामध्ये असलेल्या डेटाची कारण, चोर फोनचा गैरवापरही करू शकतात . अशात लोक त्याबद्दल एफआयआर नोंदवून फोन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, बहुतेक प्रकरणांमध्ये हरविलेला फोन सापडत नाही. अशात त्यामध्ये असलेला डेटा तुमच्या बाजूने डिलीट करणे आवश्यक आहे. म्हणूनच फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित काही पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

वाचा: एकच नंबर ! 5G स्मार्टफोन, तो सुद्धा ५ हजारात, लगेच पाहा Amazon Sale मधील ही डील

सिम कार्ड ब्लॉक:

तुमचा फोन हरविल्यास, सर्वप्रथम सिम ब्लॉक करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणीही तुमच्या नंबरचा गैरवापर करू शकणार नाही. यासाठी तुम्ही टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधू शकता. तुम्हाला मूलभूत माहिती विचारल्यानंतर ते तुमचे सिम ब्लॉक करतात. नंतर तुम्ही स्टोअरमधून सिम बदलून घेऊ शकता.

वाचा: 5G Sim Upgrade :’या’ लिंकवर क्लिक करताच अकाउंटमधून पैसे गायब, राहा अलर्ट, करू नका ही चूक

फोन ब्लॉक:

दूरसंचार विभागाची अधिकृत वेबसाइट CEIR आहे. याद्वारे युजर्स त्यांचा चोरीला गेलेल्या फोनचा तपशील देऊन ब्लॉक किंवा अनब्लॉक करू शकतात. यासाठी तुम्हाला www.ceir.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर चोरीला गेलेला किंवा हर:लेल्या फोनचा तपशील भरा आणि तो ब्लॉक करण्याची विनंती दाखल करा. यासाठी एफआयआर कॉपी व्यतिरिक्त तुम्हाला फोन खरेदी करताना मिळालेले बिल, पोलिस तक्रार क्रमांकाचा तपशील अशी काही कागदपत्रे द्यावी लागतील. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

रिमोटली डेटा हटवा:

तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असल्यास, तुम्ही www.google.com/android/find वर लॉग इन करू शकता. यानंतर तुम्हाला फोनचे डिटेल्स दाखवले जातील. फोन डेटा हटवण्याचा पर्याय निवडून तुम्ही सर्व डेटा हटवू शकता.

वाचा: आता iPhone 13 सह ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन्स सुद्धा स्वस्तात मिळणार, सुरू होतोय जबरदस्त सेल

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *