परपुरुषासोबत दिसली शाहरुखची लेक, तोंड लवपून झाली पसार


मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अडचणीत सापडला होता. बरेच दिवसांनंतर त्याच्या लेकाला या प्रकरणातून दिलासा मिळाला आणि या अभिनेत्यानं सुटकेचा नि:श्वास सोडला. या संपूर्ण प्रकरणादरम्यान शाहरुखचा मुलगा जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर येत होता तेव्हा तेव्हा त्यानं चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. (shah rukh khan, aryan khan, suhana khan)

आता म्हणे शाहरुखची लेकही तोंड लपवताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सुहानाची कार ‘मन्नत’मधून बाहेर पडताना तिला पाहिलं गेलं. 

सुहानाला माध्यमांच्या प्रतिनीधींनी कॅमेऱ्यामध्ये टीपणं ही काही नवी बाब नाही. पण, इथं मुद्दा असा की यावेळी तिच्यासोबत एक अज्ञात मुलगाही होता. 

या मुलानं आणि सुहानानं लगेचच माध्यमांना पाहताच आपले चेहरे लपवले. याआधी सुहानानं असं फार क्वचितच केलं होतं. ज्यामुळं आता तिच्यासोबत दिसणारा ‘तो’ कोण, हाच प्रश्न अनेकजण लावताना दिसत आहेत. 

दरम्यान, शाहरुखची लेक बराच काळ परदेशात असते. 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिनं इंग्लंडमधील Ardingly College येथून पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता म्हणे सुहाना तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठीही तयारी करत आहे. पण, अद्यापही ती नेमकी कोणत्या प्रोजेक्टमधून आणि कोणासोबत पदार्पण करणार आहे यावरून मात्र पडदा उठलेला नाही. Source link

Leave a Reply