Headlines

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवप्रताप गरुडझेप चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु, कारण…” : डॉ. अमोल कोल्हे | PM Narendra modi should watch Shivpratap Garudjhep movie we will trying said Dr Amol Kolhe nrp 97

[ad_1]

खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रताप गरुडझेपचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक घटनेची झलक पाहायला मिळत आहे. या दमदार ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहावा यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे यांनी सोलापुरातील अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी देवीचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या चित्रपटातील अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न करणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

त्यावर ते म्हणाले, “नक्कीच यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. कारण शेवटी आदरणीय नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशाच्या पंतप्रधानांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट पाहावा यासाठी जगदंब क्रिएशनचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच याला मूर्त रुप येईल, अशी आमची अपेक्षा आहे. केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नव्हे तर केंद्रातील जवळपास सर्वच मंत्र्यांनी आणि सर्व खासदारांनी हा चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”

आणखी वाचा : अमोल कोल्हेंचा बहुचर्चित ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, नवा टीझर चर्चेत

या ट्रेलरची सुरुवात “अब हिंदू ही हिंदू को काटेगा…” या औरंगजेबच्या वाक्याने होते आणि अंगावर एकच काटा येतो. औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या जन्मतिथीचे आमंत्रण देतो. छत्रपती शिवरायांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हुकुम एका सरदाराला देतो. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला आल्यावर तेथे काय काय नाट्यमय घडामोडी घडतात, या सर्वांचा थरार आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. “औरंगजेब आमच्या हालचालींवर मर्यादा घालू शकतो, आमच्या बुद्धीवर नाही…” असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज आपली आग्र्याहून कशाप्रकारे सुटका करुन घेतात याची झलकही पाहायला मिळत आहे. या दमदार ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान येत्या ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मोगल बादशाह औरंगजेब आणि अभिनेत्री मनवा नाईक ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जगदंब क्रिएशन’ आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *