Pan Card: १८ वर्षांखालील मुलांचेही पॅन कार्ड बनवणे सहज शक्य, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस


नवी दिल्ली : Minor PAN Card: पॅन कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. याचा वापर आर्थिक व्यवहाराशी संबंधित कामे करण्यासाठी होतो. बँक खाते उघडायचे असो अथवा इतर कामे असो, पॅन कार्ड गरजचे आहे. याशिवाय, डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी देखील या कार्डची गरज पडते. ओळखपत्राचा पुरावा म्हणून देखील पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकांना वाटते की पॅन कार्ड बनवण्यासाठी वय १८ वर्षांचे पुढे असणे गरजेचे आहे. मात्र, असे नाहीये. १८ वर्षांखालील लहान मुले देखील पॅन कार्ड बनवू शकता. अनेकदा परदेशात प्रवास करण्यासाठी अथवा शाळेच्या कमासाठी लहान मुलांच्या पॅन कार्डची गरज असते. तुम्ही सहज १८ वर्षांखालील लहान मुलाचे पॅन कार्ड काढू शकता. याविषयीची प्रोसेस जाणून घेऊया.

१८ वर्षांखालील लहान मुले पॅन कार्डसाठी थेट स्वतः अर्ज करू शकत नाही. पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी पालकांची मदत घेऊ शकतात. १८ वर्षांखालील लहान मुलाचे पॅन कार्ड बनवण्यासाठी आई व वडील दोघांचा रहिवासी दाखला, ओळखपत्र, पालकांचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, पासपोर्टपैकी एक कागदपत्र असणे गरजेचे आहे. या कागदपत्रांचा वापर करून तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता.

पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एनएसडीएलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर मुलांच्या अर्जासाठी कॅटेगरीमधील पर्याय निवडा. आता सर्व आवश्यक माहिती भरा. याशिवाय, मुलांच्या वयाशी संबंधित माहिती व कागदपत्रांची कॉपी देखील अपलोड करावी लागेल. फॉर्म भरताना आई-वडील दोघांना स्वतःचे फोटो, कागदपत्रं आणि डिजिटल साइनला वेबसाइटवर अपलोड करावे लागेल. या प्रोसेसनंतर तुम्हाला पॅन कार्डसाठी १०७ रुपये पेमेंट करावे लागेल. आता अर्ज सबमिट करा. काही वेळानंतर तुमच्या रजिस्टर्ड मेलवर एक कंफर्मेशन मेसेज येईल. या मेसेजमध्ये कंफर्मेशन नंबर असेल. यानंतर व्हेरिफिकेशन केले जाईल. व्हेरिफिकेशननंतर जवळपास १५ दिवसांनी पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही सहज तुमच्या मुलाचे पॅन कार्ड बनवू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.onlineservices.nsdl.com/ या साइटला देखील भेट देऊ शकता.

वाचा: Android Smartphone: अँड्राइड यूजर्सला सरकारने केले सावध, त्वरित करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान

वाचा: National Technology Day: … म्हणून खास आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, जाणून घ्या याबाबत ५ महत्त्वाच्या गोष्टी

वाचा: iPhone 14: आयफोन १४ ची किंमत लीक! ‘या’ फीचर्सचा देखील झाला खुलासा; पाहा डिटेल्स

वाचा: Elon Musk : Donald Trump ट्विटरवर परतणार? Elon Musk म्हणाले…

Source link

Leave a Reply