‘पक्षाने सांगितले तरीही मी वडिलांच्या विरोधात प्रचार करणार नाही’

लखनौ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मात्र त्यांची कन्या आणि बदाऊनच्या खासदार संघमित्रा मौर्य अजूनही भाजपमध्येच आहेत. संघमित्रा मौर्य सांगतात की, पंतप्रधान मोदी हे देखील आपल्या वडिलांसारखे आहेत, पण पक्षाने विचारले तरी त्या आपले वडील स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात प्रचार करणार नाहीत. एका हिन्दी टीव्ही वाहिनीशी बोलताना संघमित्रा मौर्य म्हणाल्या की, मी भाजपसोबत आहे आणि राहीन. माझ्या वडिलांनी सपामध्ये येण्यापूर्वी कोणतीही चर्चा केली नाही. माझ्यावर भाजप सोडण्याचा कोणताही दबाव नाही. कौटुंबिक जीवन आणि राजकीय जीवन पूर्णपणे भिन्न आहे. मी संपूर्ण राज्यात भाजपचा प्रचार करणार आहे. मात्र पक्षाच्या सांगण्यावरूनही मी वडिलांच्या विरोधात प्रचार करणार नाही. मला भाजपच्या लोकांना निष्ठेचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही

स्वामी प्रसाद मौर्य कुशीनगरच्या पडरौना मतदारसंघातून आमदार आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांनी नुकताच उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. 2016 मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी मायावतींचा बहुजन समाज पक्ष सोडला आणि 2017 च्या यूपी निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला.

Leave a Reply